दि. २५।११।२००९ ला सर्वेज्य सांस्कृतिक भवन उद्‍घाटन प्रसंगी विविध मान्यवरांनी व्यक्‍त केलेल्या शुभभावना.

मान. आम. श्री. काकासाहेब पाटील, निपाणी

परमपूज्य परमात्मराज महाराजांच्या चरणी वंदन करतो. त्यांनी भव्य असं सांस्कृतिक भवन इथे उभं केलयं. महाराजांचे दर्शन अलौकिक आहे. जगाच्या कल्याणासाठीच त्यांचे कार्य आहे. अध्यात्म समाजासाठी त्यांच्यासारख्या ऋषितुल्य व्यक्‍तीच्या सान्निध्यात आपण गेलं पाहिजे. आपला भाग त्यांच्या वास्तव्यामुळं अतिशय पावन झाला आहे. आमच्या सारख्या पामरांकडून असंख्य प्रकारचे अपराध झाले तरी सुद्‍धा ते पावन मनाचे योगी असल्यामुळे ते माफ करतात. भक्‍तांना नवीन चेतना देतात. परमाब्धिकार परमात्मराज महाराजांना दीर्घायुष्य लाभावे, अशी प्रार्थना.

आम. काकासाहेब पाटील
(मान. आमदार श्री काकासाहेब पाटील, निपाणी मतदार संघ)

मान. आम. श्री. सतेज उर्फ बंटी डी. पाटील, कोल्हापूर

आदरणीय परमपूज्य परमात्मराज महाराजांच्या पायाने पुनीत झालेली ही भूमी आहे. या संपूर्ण परिसरामध्ये एक चांगल्या पद्‍धतीचे आध्यात्मिक वातावरण आहे. आपले वैचारिक प्रदूषण घालवायचे असेल तर इथेच आपल्याला यावे लागणार आहे. डॉ. डी. वाय्‌. पाटील व त्यांचे कुटुम्बीय आम्ही सर्वजण परमात्मराज महाराजांचे भक्‍त आहोत व महाराजांच्या या संस्थेसाठी भक्‍त म्हणून आम्ही कायमपणे कार्य करीत राहू.

सतेज डी. पाटील
(मान. आमदार. श्री. सतेज उर्फ बंटी डी. पाटील, कोल्हापूर)

मान. माजी आम. श्री. संजयबाबा घाटगे, कागल

आदरणीय प. पू. परमात्मराज महाराज यांचे चारित्र्य, कर्तृत्व आणि वक्‍तृत्व हे सर्वांना मार्गदर्शन करणारे आहे. त्यांच्यामुळे सर्वेज्य सांस्कृतिक भवन हे सुंदर स्थान निर्माण झाले आहे. त्यांनी सर्वांना सद्‍बुद्‍धी द्यावी, अशी सदिच्छा व्यक्‍त करतो.

माजी आम. श्री. संजयबाबा घाटगे, कागल

मान. श्री. आनंदराव पाटील चुयेकर, संस्थापक अध्यक्ष, गोकुळ दूध संघ

प. पू. परमात्मराज महाराजांनी जे सर्वेज्य सांस्कृतिक भवन निर्माण केलं आहे ते सर्वांसाठी केलं आहे. सर्व जातिधर्मातील, सर्व पक्षातील लोकांच्या कल्याणाकरिता त्यांनी ‘परमाब्धि:’ ग्रंथ लिहिला आहे.

आनंदराव पाटील चुयेकर
(मान. श्री. आनंदराव पाटील चुयेकर, संस्थापक अध्यक्ष, गोकुळ दूध संस्था जि. कोल्हापूर)

मान. उद्योगपती श्री. गिरीश शहा, कोल्हापूर

प. पू. परमात्मराज महाराजांनी आतापर्यंत आमच्यावर टाकलेली जबाबदारी आम्ही पार पाडली आहे. त्यांना इथून पुढेही आमच्यावर कोठलीतरी जबाबदारी सोपवावी. त्यांचा आम्ही कायम आदेश पाळू.

गिरीश शहा
(मान. उद्योगपती श्री. गिरीश शहा, कोल्हापूर)