अभिप्राय

"परमाब्धि" हा विश्वाला गवसणी घालणारा ग्रंथ
श्री दत्तगुरुंच्या परम्परेमध्ये ज्यांनी गुरुपद भूषविले आहे,त्या सर्वांना नतमस्तक हॊऊन वन्दन करतॊ.गुरुपरम्परेला वन्दन आहे.

माशीसारखे असणारे मन केवळ सांसारिक बाबींवरच बसते. परमेश्वरावर बसत नाही. स्वःताचे अस्तित्व वेगळे ठेवण्यासाठी मनुष्य परमेश्वराच्या जवळ जात नाही.

परन्तु परमात्म्याचा जॊ धर्म,परमात्म्याला जाणण्याचा जॊ धर्म तॊ स्वधर्म हॊय.मी जन्माला आलॊ आहे, मला भगवंताला जाणून घ्यायचे आहे,आणि माझ्या आयुष्याची इतिकर्तव्यता करायची आहे. यादृष्टीने जॊ काही कार्यभाग तॊ स्वधर्म हॊय.

विशेषत:मनुष्यासंबंधीचा विजय धर्माच्या द्वारा परमाब्धिमधून सांगितला गेला आहे.परमाब्धिमधून सम्पूर्ण विश्वाला गवसणी घालण्याचा प्रयत्न महाराजांनी केला आहे

श्री विद्यनृसिंहभारती स्वामी
(जगदगुरु शंकराचार्य करवीरपीठाधिपती प.पू.श्री.विद्यनृसिंहभारती महाराज,कॊल्हापूर)

परमाची सागरावस्था म्हणजे "परमाब्धि"
समुद्राच्या दिशेने नदी वाह्त असते.कितीही अडथळे आले तरी त्या अडथळ्यांवर मात करुन नदी पुढे पुढे जात असते.सर्व नद्यांना सामावून घेण्यासाठी समर्थ असतॊ;अत्यन्त विशाल,अमर्याद,अथांग आणि अपार असतॊ.आपले लाखॊ गॅलन पाणी नद्या अखंण्डपणे ऒतत राहिल्यात तरी त्यांना सामावून घेण्याचे सामर्थ्य फ़क्त सागरात आहे.जिथे नदी स्वता:ला सागरात झॊकून देते तिथे नदी ही नदी राह्त नाही.समुद्राशी एकरुप हॊते.हीच एकरुपता नदीची परिसमाप्ती आहे.

प्रत्येक माणूस हा नदीप्रमाणे धावत आहे.कॊणताही जीव.कॊणताही माणूस मग तॊ कॊणत्याही जातीचा,धर्माचा.पंथाचा असॊ त्याची परिसमाप्ती म्हण्जेच ’परमाब्धि’ माणूस श्रेष्ठ असॊ वा कनिष्ठ असॊ,माणूस म्हणून जॊ जॊ जन्माला आला आहे त्याची परिसमाप्ती परमाब्धिमध्ये आहे.परमॊच्च अशी सागर स्थिती म्हणजे परमाब्धि.परमाची सागरावस्था म्हणजे ’परमाब्धि’

गुरु साक्षात परब्रह्नास्वरुप आहेत.आमच्या जीवनात गुरुचा स्पर्श पाहिजे.परमात्मराज हे नाव फ़ार सुन्दर आहे.राजवत प्रकाशते इति राज:।जॊ स्वत:च्या परमात्मस्वरुपाने चैतन्य

परमात्मराज हे नाव फ़ार सुन्दर आहे.राजवत प्रकाशते इति राज:।जॊ स्वत:च्या परमात्मस्वरुपाने चैतन्यस्वरुपात या विश्वामध्ये व्यक्त हॊतॊ तॊच परमात्मराज आणि तॊच सदगुरु भगवान दत्तात्रेय.तॊ आपल्या सर्वांवर कृपा करॊ,आपल्या जीवनाला एक दिव्य स्पर्श प्राप्त करुन देवॊ. आमचं जीवन निदान थॊडं तरी का हॊईना,आचारानं विचारानं,भावनेनं शुद्ध हॊऊ दे,आणि आमच्या जीवनामध्ये हरवलेले तॊ शुद्ध आनंद,आत्मशान्ती आम्हाला प्राप्त करुन देऊन याच शरीरामध्ये आमचं जीवन कृतकृत्य,परिपूर्ण हॊऊ दे.हीच मी परमात्मराज,दत्त महाराजांना प्रार्थना करतॊ,आणि याठिकाणी थांबतॊ.

स्वामी स्वरुपानंद सरस्वती
(पत्ता-प.पू.श्री स्वामी स्वरुपानंद सरस्वतीजी महाराज फ़ुलगांव,ता.हवेली,जि.पुणे)

"परमाब्धि"हा सर्व जीवांच्या कल्याणासाठी

परमात्मराज असे ज्यांचे नामाभिधान प्रत्यक्ष भगवान श्री दत्तगुरुनी केलेले आहे,त्या नांवास साजेसे कार्य ’परमाब्धि.’या ग्रंथरुपाने आविर्भूत झाले आहे.त्यातील श्रुति स्मृति पुराणयुक्त वैचारिक धनाचे वितरण जगाच्या कानाकोपर्‍यात होण्यात योग्य आहे.समस्त जीवांच्या अंतिम कल्याणासाठी व अभ्युद्य नि:श्रेयसासाठी हा अमुल्य ठेवा चिरंतन जपण्यास,अनुभवण्यास,अनुसरण्यास,अभ्यासण्यास पात्र आहे.इतकेच नव्हे तर सांप्रतच्या सर्व संकुचित विचरधारणा परमाब्धित विसर्जन पावणे अत्यावश्यक आहे.तीच एकमेव काळाची गरज आहे.कालौघात इथुन पुढेही उत्पन्न होण्यार्‍या अशा प्रकारच्या नवनवीन अनेक विचाराधारा स्वत:च्या शुद्ध दिव्य अतिविशाल अनादि अनंत स्वरुपात समाविष्ट करुन घेण्यास परमाब्धित समर्थ आहे.श्री दत्तप्रभूंना स्मरुन,त्यांची आपणा सर्वातर्फ़े प्रार्थना करुन साराचे सार म्हणून एकाच वाक्यात उदघोष करतो की,परमात्मराजांचा परमाब्धित ग्रंथ हा स्वयमेव मृगेन्द्रता व अमरत्वाचा पट्टा घेऊन जन्मास आला आहे.अवधूत चिन्तन श्री गुरुदेव दत्त

श्री.दामोदरानन्द सरस्वती स्वामी
(परमहंस परिव्राजकाचार्य दण्डी स्वामी प.पू.दामोदरानंद स्वामी सरस्वती महाराज श्री क्षेत्र वाराणसी)

"परमाब्धि"ग्रंथ कैवल्यसुखरुप

आडी सुक्षेत्र श्रीदत्तमंदीराचे पूज्यश्री श्री परमात्मराज महाराजरु(राजीव महाराज) देववंशसंभूत आहेत.ते या प्रदेशात आपल्यापासून अनेक धार्मिक कामे मेरूपर्वताप्रमाणे होत आहेत.अनेक बांधकामे पूर्ण झाली आहेत.अनेक बांधकामे पूर्णत्त्वाकडे जात आहेत.

ऎवढेच नाही तर त्यांच्या अमोघवाणीतून बाहेर आलेला परमाब्धि ग्रंथ हा वाचणार्‍यांना आनंददायक आहे.आणि रोज नित्यपारायण करणार्‍यांना कैवल्य सुखाप्रमाणे आहे.

महाराजांचे दर्शन हे आजूबाजूच्या अनेक भक्तांसाठी कल्पवृक्षरुप झाले.त्याचे व्यक्तित्त्व उत्तुंग शिखराप्रमाणे आहे. दिनांक २० मे ला (असणारा)त्यांचा जन्मोत्सव जनतेसाठी फ़ार आनंद आणणारा आहे.असे हे पुण्यपुरूष ’जीवेत्‌ शरद शतम’ या उक्तीच्या अनुसार शंभर वर्षे जगावेत.या जगाला (त्यांनी)ज्ञानप्रकाश देत रहावा.अशा या महापुरुषाला आमचे अनन्त नमस्कार.

श्री.म.नि.प्र.शिवबसव महास्वामीगळू
अप्पन्नवर मठ,खडकलाट,ता.चिकोडी.

"परमाब्धि" हा धर्माला चेतनाशक्ती देणारा अमुल्य ग्रंथ

निराकार ईश्वर प्रेमस्वरुप असून दयेचा,ज्ञानाचा महासागर "परमाब्धि" रुपाने प्रकट झाला आहे.या परमगुरुरुपहि असलेल्या सागरच्या किनार्‍यावर बसून जप,तप,केल्याने मानव संसारातून मुक्त होईल.मानव धर्म निरन्तर ज्ञान प्रकाशरुप असल्यामुळे त्याद्वारे शान्तीचे साम्राज्य येईल. विश्वबंधुत्व निर्माण होईल व पवित्र्य वाढेल.

परमात्मराज यांच्या अमोघ अनुष्टानामुळे हा परमाब्धि ग्रंथ निर्माण झाला आहे.हा महाग्रंथ मानवजातीसाठी कल्याणकारक आहे.हा परमग्रंथ आहे.

मानव धर्माचे प्रतिपादन करणार्‍या या ग्रंथात ॐकार या महान शक्तीचे वर्णन आहे.ॐकार हा शान्ति,समाधान देणारा आहे;सिद्धिकारक आहे. याचा महत्त्वपूर्ण विस्तार परमपुज्य श्री परमात्मराज महाराजजींनी केला आहे.या ग्रंथातील प्रत्येक वाक्यात शाश्वत तत्व सांगितले आहे.हा ग्रंथ वेदरुप आहे.

या ग्रंथात सांगितल्याप्रमाणे प्रत्येक राष्ट्रात,प्रत्येक राज्यात, प्रत्येक भागात,प्रत्येक गावात,प्रत्येक घरात हा ग्रंथ वाचला जावा.तात्पर्य असे की, जगातील प्रत्येक हदयात या ग्रंथाचे पठण व्हावे.त्यामुळे शान्ति,समाधान प्राप्त होईल.

आज कलियुगामध्ये धर्माच्या नावाखाली कटुता,द्वेष.हिंसाचार,भयानक आतंकवादी कृत्ये माजविली जात आहेत. अमानुष हिंसक वातावरणात निरपराध मानसांना पायदळी तुडवले जात आहे.धर्म,जातिपाती,वर्णभेद इत्यादींच्या नावाखाली माणसाला माणसापासून विभाजले जात आहे.मानवतेचे विघटण करणार्‍या या अमानुष हिंसक कृत्यांना धार्मिकता म्हणता येणार नाही.सध्याच्या परस्थितीत अनेक धर्म निर्माण झाले आहेत.त्यात परस्पर वैमन्य वाढले आहे.शस्त्रास्त्रांद्वारे वैरत्व वाढल्याने समाजविरोधी,धर्मविरोधी वातावरण पसरले आहे.परन्तु हे अनृत,हा अनाचार सोडून देऊन खरा मानवधर्म समजून घ्यायला पाहिजे.त्यासाठी आम्ही धर्मात्म्याला मानले पाहिजे.त्यामुळे मानवधर्माचा विजय खेचुन आणला जाईल.तीच खरी धर्मोन्नती होईल.

ज्याचे मनन,वाचन केल्याने,ज्याचे साहचार्य लाभल्याने मन शांती प्राप्त होते.असा ह एकमेव ग्रंथ म्हणजे ’परमाब्धि’ सार्वकालिक व सार्वत्रिक अशा धर्माला आकार देणारा परिपूर्ण ग्रंथ म्हणजे ’परमाब्धि’

या ग्रंथात योगाच्या विविध प्रकारांचे वर्णन आहे.या ग्रंथात चित्तस्थिर करण्याचे साधनरुप असलेला जप सांगितला आहे.हा ग्रंथ सर्वांसाठी ज्ञानदायक,ध्यानयोग्य व मनःकामनापूर्तिकारक आहे.हा ’परमाब्धि’ सर्वाना इष्टार्थप्राप्ती करुन देणारा महान्‌ क्षीरसागर आहे.

हा ग्रंथ साध्या लेखणीतून उतरलेला नसून परमपवित्र देवनागरी लिपीत परिशुद्ध्‌ संस्कृतमध्ये निर्माण झालेला आहे.हा ग्रंथ वाचल्याने मनाला समाधान मिळ्ते.हा ग्रंथ भवसागरातून पलीकडे नेतो.हा नवचैतन्य प्रदान करणारा व दिव्यज्ञान देणारा हा अमूल्य ग्रंथ आहे. ’परमाब्धि’ हा महान ग्रंथ देववाणीत तयार झालेला,बहुमूल्य व अमोघ असा आहे.साध्या मानवाच्या हातून हे कार्य होत नाही.’परमाब्धि’ ग्रंथ म्हणजे देवरुप मानवाच्या हातून तयार झालेली अमोघ अशी सर्वोत्तम कृती आहे.

परमात्मराज महाराजांनी आमची भेट (इ.२००७ मध्ये) गळतगा येथील कार्यक्रमात झाली.त्यांचा प्रेमळ,वात्सल्यमय चेहरा पाहून अतिशय स्नेहसम्बन्ध त्यावेळी निर्माण झाला.त्यानंतर महाराजांचा ग्रंथ वाचून मला अत्यानंद झाला.माझा आनंद गगनात मावेना.

हा ’परमाब्धिः’ ग्रंथ सर्वतोपरी निर्दोष आहे.सुसंस्कृत आहे.गुरुकृपेमुळे निर्माण झालेला हा ग्रंथ आहे.

ष.ब्र.प्रभुलिंग शिवाचार्यस्वामी ,
पत्ताःप.पू.ष.ब्र.प्रभुलिंग शिवाचार्य
महास्वामीजी,सिद्धे‌श्चर मठ,
मु.पो.हिटणी,ता.गडहिंग्लज,
जि.कोल्हापूर