You are here : Home >> Publications >> भाविक भावना (वार्षीकांक २००७)

भाविक भावना (वार्षीकांक २००८) - या अंकाच्या अंतरंगाविषयी

ज्ञान प्राप्त करुन घेण्याची इच्छा असणारयांनी परमाब्धिग्रंथाचे पुन्हा पुन्हा वाचन करावे.परमाब्धिरुपाने सर्ववेध ज्ञान प्रकट झाले आहे.

परमाब्धिविषयी तसेच परमाब्धिकार परमात्मराज महाराजांच्या विषयी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी ’भाविक भावना ’ या अंकाच्या रुपाने एक माध्यम भाविकांना उपलब्ध झाले आहे. या अंकाचे निश्चित स्वरुप काय आहे, हे या अंकाच्या नावावरुन सहजपणे कळुन येण्या सारखे आहे

परमाब्धि प्रसार महोत्सव २००७ मध्ये तसेच महाराजांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने २० मे २००८ च्या कार्यक्रमामध्ये अनेक साधु संतांनी व अन्य़ वक्त्यांनी आपल्या ज्या भावना व्यक्त केल्या आहेत त्या त्या भाविक भावना (इ २००८) अंकात समाविष्ट आहेतच. त्या शिवाय अनेकांनी जे परमाब्धिगौरवपर लेख पाठविलेत, महाराजांच्या विषयी अनुभवर्णनात्मक लेख वा भावनाप्रधान लेख पाठविलेत त्या लेखांचा हि या अंकात समावेश आहे. अशाप्रकारे आकाराने लहान किंवा मोठे असे सर्ववेध एकुण २३० लेख (६४+१२६+४०) या अंकात प्रसिध्द केले आहेत.

प. पु. परमात्मराज महाराजांच्या विषयी उत्कट श्रध्दाभाव व्यक्त करणारी जी पुष्कळशी भक्तिगीते अनेकांनी पाठविलीत त्यापैकी सव्वाशे भक्तिगीते आम्ही या अंकात प्रसिध्द केली आहेत.अशाप्रकारे विविध भागांमधील,विबिध स्तरामधील व्यक्तिंनी गद्य वा पद्याच्या माध्यमातुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

या अंकात लेख/गीते देऊन तसेच जाहीरातिद्वारे आपल्य शुभेछा व्यक्त करुन किंवा अन्य प्रकारे ज्यांनी ज्यांनी या अंकाच्या निर्मितिसाठी सहयोग प्रदान केला आहे त्यांचे आम्ही आभारी आहोत.संगणकीय जुळवणी कर्ते,मुखपॄष्ट्प्रारुप कर्ते व मुद्रक यांचे आम्ही आभरी आहोत.श्रीराम महाराज व श्री विशाल महाराज यांचाहि या अंक निर्मितीसाठी सहयोग लाभाला आहे हे इथे विशेषत्वाने नमुद करत आहोत.

आपले नम्र,
श्री देवीराज महाराज श्री नामदेव महाराज
श्री मंजुनाथ महाराज श्री अमोल महाराज
व आश्रमस्थान अन्य संग्राहक वर्ग


अनुक्रमणिका - भाविक भावना (वार्षीकांक २००८)
Please click on the following titles to see the details