You are here : Home >> Publications >> भाविक भावना (वार्षीकांक २००९)

भाविक भावना (वार्षीकांक २००९) - या अंकाच्या अंतरंगाविषयी

प. पू. परमात्मराज महाराजांनी लिहिलेल्या परमाब्धि ग्रंथाचा प्रसार करण्याच्या मुख्य उद्देशाने इ. स. २००९ सालाचा ‘भाविक भावना’ अंक प्रसिद्ध होत आहे.

या अंकाच्या पहिल्या भागात संगीत, राजकारण, पत्रकारिता, उद्योग इ. क्षेत्रातील मान्यवरांचे परमाब्धिग्रंथाविषयीचे अभिप्राय प्रसिद्ध केले आहेत. देशाच्या विविध भागांमधील साधुसंतांचे व धार्मिक क्षेत्रातील अन्य मान्यवरांचे अभिप्राय दुसर्‍या भागात समाविष्ट आहेत. साहित्य, अर्थकारण, समाजकारण, शिक्षण, आरोग्य इ. क्षेत्रांमधील माननीय व्यक्‍तींचे अभिप्राय तिसर्‍या भागात आहेत.

प. पू. परमात्मराज महाराजांच्या विषयी असलेले अनुभववर्णनात्मक लेख हे चौथ्या भागात, भावप्रधान लेख हे पाचव्या भागात असून महाराजांच्या विषयी अनेकांनी लिहिलेल्या भक्‍तिगीतांसाठी सहावा भाग आहे.

यावर्षी अंकातील लेखांची संख्या ४११ (१३२+८१+११७+६१+२०) असून गीतसंख्या ८४ आहे. या अंकात अभिप्रायात्मक लेख किंवा अन्य लेख देऊन, कविता देऊन तसेच जाहिरातींद्वारे आपल्या शुभेच्छा व्यक्‍त करुन किंवा अन्य प्रकारे ज्यांनी ज्यांनी या अंकाच्या निर्मीतीसाठी सहकार्य केले आहे त्या सर्वांचे आम्ही आभारी आहोत. संगणकीय जुळवणीकर्ते, मुखपृष्ठप्रारुपकर्ते व मुद्रक यांचेही आम्ही आभार मानतो. श्रीराम महाराज, श्री दत्तात्रेय महाराज चिंचखेडकर व श्री विशाल महाराज, यांचेही या अंकाच्या निर्मितीसाठी सहकार्य लाभले.

आपले नम्र,
श्री देवीराज महाराज श्री नामदेव महाराज
श्री मंजुनाथ महाराज श्री अमोल महाराज
व आश्रमस्थान अन्य संग्राहक वर्ग


अनुक्रमणिका - भाविक भावना (वार्षीकांक २००८)
Please click on the following titles to see the details