You are here : Home >> Publications >> भाविक भावना (वार्षीकांक २०१०)

भाविक भावना (वार्षीकांक २०१०) - या अंकाच्या अंतरंगाविषयी

भाविक भावना (इ.स.२०१०) हा अंक भाविकांच्या हाती देतांना आनंद होत आहे. प.पू.परमात्मराज महाराजांनी लिहिलेल्या ‘परमाब्धि’ ग्रंथाचा सर्व क्षेत्रांमधील लोकांमध्ये प्रसार व्हावा, हा मुख्य हेतू ठेवूनच दरवर्षी हा अंक प्रसिद्ध करीत आहोत.

यावर्षीच्या या ‘भाविक भावना’ अंकाच्या पहिल्या भागात राजकारण, साहित्य, क्रीडा, पत्रकारिता, उद्योग इत्यादि क्षेत्रांमधील मान्यवरांचे अभिप्राय प्रसिद्ध करण्यात आले आहेत. देशाच्या विविध राज्यांतील साधुसंतांचे व धार्मिक क्षेत्रातील अन्य मान्यवरांचे अभिप्राय दुसर्‍या भागात समाविष्ट आहेत. वैज्ञानिक संशोधन, शिक्षण,विधी, अरोग्य, अर्थकारण, समाजकारण इत्यादि क्षेत्रांमधील मान्यवरांच्या अभिप्रायांसाठी तिसरा भाग आहे.

या अंकाच्या चौथ्या भागात प.पू.परमात्मराज महाराजांच्या विषयी अनेकांचे अनुभव वर्णनात्मक लेख आहेत. पाचव्या भागात भावप्रधान लेख असून महाराजांच्याविषयी अनेकांनी जी भक्‍तिगीते लिहिली आहेत ती साहव्या भागात समाविष्ट आहेत.

या अंकात एकूण सव्वाचारशे (१०१+१५१+८३+६५+२५) लेख प्रसिद्ध करण्यात आले असून गीत संख्या ७५ आहे. या अंकात अभिप्रायात्मक लेख किंवा अन्य लेख देऊन, कविता देऊन तसेच जाहिरातींद्वारे आपल्या शुभेच्छा व्यक्‍त करुन किंवा इतर प्रकारेही ज्यांनी ज्यांनी या अंकाच्या निर्मितीसाठी हातभर लावला आहे त्या सर्वांचे आम्ही आभारी आहोत. संगणकीय जुळवणीकर्ते, मुखपृष्ठ प्रारुपकर्ते व मुद्रक यांचेही आम्ही आभारी आहोत. श्री विशाल महाराज, श्री दत्तात्रेय महाराज चिंचखेडकर, श्री जगदीश्वरानंद महाराज, श्री विवेक शर्मा महाराज, श्री राजाराम महाराज हेरवाडकर, श्री ज्ञानेश्वर महाराज, श्री मंजुनाथ महाराज इत्यादी काही जण या कार्यात काही काळ संलग्न होते. या अंकासाठी अनेकांचे सहकार्य लाभले आहे, हे इथे विशेषत्वाने नमूद करीत आहोत.

आपले नम्र,
श्री देवीराज महाराज श्री नामदेव महाराज
श्री मंजुनाथ महाराज श्री अमोल महाराज
व आश्रमस्थान अन्य संग्राहक वर्ग


अनुक्रमणिका - भाविक भावना (वार्षीकांक २००८)
Please click on the following titles to see the details