You are here : Home >> Publications >> भाविक भावना (वार्षीकांक २००७) >> प. पु. परमात्मराज महाराजांच्या विषयी अनेकांनी लिहीलेली भक्तिगीते

प. पु. परमात्मराज महाराजांच्या विषयी अनेकांनी लिहीलेली भक्तिगीते

कळ्याफुले ही प्रेमाने आनन्दाश्रूंनी भिजली।
परमात्मराज वाढदिवशी ही धरणी हो सजली।
नयनमनोहर रुप साजे,तेजोमय ही सृष्टी भासे।
जनकण्ठातून सनई वाजे,दिशास्थिती रोमांचली॥१॥
सजावटीचे सुन्दर आस्न,आरुढ होता घेऊ दर्शन।
कृपादृष्टीने होऊन पावन,सर्व मने हर्षली॥२॥
देहाची करू धूपपंचारती,स्वरसुमनांनी गाऊ आरती।
भक्तीरसाची टाळमंजिरी,तालबद्ध वाजली॥३॥
सर्व जगाचा अन्तर्यामी,म्हणून माथा झुकवितो आम्ही।
आले आता नयनी पाणी,लाभो आम्हा साऊली॥४॥

भाग्यवंतानो,या हो या।
दर्शण घेऊन सुखवाया॥धृ॥
परमात्मराज अथांगसागर
दुःखिजनांचा संकटहार।
कलयुगातील हा परमेश्वर
ब्रम्हा विष्णू आणि महेश्वर॥१॥
आजानुबाहू रूप मनोहर
कमलनयन क्वचित भयंकर
योगिराज हा तरीहि कोमल
आनंदी हे चराचर॥२॥

तो हा परमात्मराज पहिला॥धृ॥
या स्वामीचे दत्तगुरूंनी।
परमात्मराज हे नाम ठेवुनी।
सगळा बोध कृतार्थ केला॥१॥
येता वेळ ही यशःपूर्तीची।
जनहितविषयक कर्तव्याची।
परमाब्धी त्यांनी जगास दिला॥२॥
दिवस असा विजयीदशमीचा।
प्रवेश झाला परमाब्धिचा।
देवादिकांना हर्ष जाहला ॥३॥
’जय परेश सर्वायण’मंत्र ।
सर्वजगाचा तारक मंत्र।
सागराचा सारचि दिधला॥४॥

पहिली परमात्माराजमूर्ती।
गातो आम्ही त्यांची कीर्ती॥धृ॥
काही वर्षापूर्वी आले कोठून तरी।
निवासस्थळ झाले आडी संजीवनगिरी॥१॥
पाहिले जनांनी त्यांचे अतिकठीण अनुष्ठान।
श्रीगुरूदत्त प्रकट जाहले,जाहले स्वप्न पूर्ण॥२॥

प्रभातसमयी जागा होई,भूपाळीच्यां छानस्वरांनी।
दर्शन घेण्या भास्कर उगवे अपुल्या सुवर्ण किरणांनी॥धृ॥
गुरूदत्त पादुकांची पूजा केली परमात्मराजांनी।
कृतार्थ होऊनि भक्त पाहती दृश्य अपुल्या नयनांनी॥१॥
औदुम्बरास पाणी घातले परमात्मराज स्वामींनी।
त्यांचे दर्शन घेण्या लोटांगण घातले भक्तांनी॥२॥
तेजःपुंज रूपाने या नित्यदर्शन घेऊन।
नरजन्माचे सार्थक होते बोध तयांचा मानूनी॥३॥

जय जय परमात्मराज रूप दत्त।
तारतसे म्हणून आम्ही निश्र्चिंत ॥धृ॥
अहंपणाने हो पडेल पायावर धोंडा
अहंकार सोडून भक्तीभाव हृदयी जोडा ॥१॥
परमाब्धि वाचावा गावा भक्तीने
सर्वजनांनी श्रद्धेने अन्‌ प्रेमभराने॥२॥

विश्र्वाच्या कल्याणासाठी श्रीदत्त असे धावला।
परमात्मराजरूपाने या विश्र्वमंत्र साकारला॥धृ॥
त्यांची लेखणी लिहिती झाली विश्र्वाच्या रक्षणा।
आकाशात ही उंच भरारी घेत गेली क्षणाक्षणा॥१॥
प्रकट झाला वैश्र्विक्मंत्र जय परेश सर्वायण।
या मंत्रासी जपू गाऊ सारे सारे आपण॥२॥

आज मन हे आनंदले आकाशी चांदणे जसे।
पोर्णिमेच्या उत्सवात तेजःपुंज गुरूमूर्ती दिसे॥धृ॥
परमात्मराज हे गुरू अमुचे तुमचे
परमाब्धि हेही रूप साजिरे त्यांचे ॥१॥
पोर्णिमेस उपदेश करिती श्रीगुरू।
सर्वांगी बोधामृत भरवी श्रीगुरू॥२॥
व्याकुळलेल्या मनामनांवर सतत।
अमृतशब्ध श्रीगुरूचे असती बरसत॥३॥