You are here : Home >> Publications >> भाविक भावना (वार्षीकांक २००८) >> प. पु. परमात्मराज महाराजांच्या विषयी अनेकांनी लिहीलेली भक्तिगीते

प. पु. परमात्मराज महाराजांच्या विषयी अनेकांनी लिहीलेली भक्तिगीते

करितो सद्‌गुरु परमात्मराज यांना वंदन।
करितो सद्‌गुरु परमात्मराज यांचे अर्चन।
चरणांबुजी सुमनांजली करितो आम्ही अर्पण।
कोटिरव जयजयकार गगनमण्डपा जाई भेदून॥१॥
ज्ञानरुप हा अज्ञानहारी सद्‌गुरु घालवी झोप।
हृदयाकाशी ज्योत चेतवून लावितसे ज्ञानदिप॥२॥
परमाब्धिकार परमचैतन्य परमात्मराज सद्‌गुरु।
जगन्नयक हा केवळ ईश्वर आहे हो परात्परु ॥३॥
अनन्त शिष्यगण याचे असती हा असे हा पापहारक।
प्रपंची भरकटलेल्यास नेई मोक्षतीरी हा तारक॥४॥
सद्‌गुरुचरणस्पर्शे आनंदडोही बुडे शिष्य।
सद्‌गुरुच्या अनुग्रहाने दिव्यानंदी लोळे शिष्य ॥५॥
वार्धक्याने ग्रासलो असे,परी ओढ दर्शनाची।
जाहली तृप्तता मनाची,भेट होता पाऊलांची॥६॥
सद्‌गदित जाहला मम कंठ,भरली आसने लोचनी।
गुरु परमात्माराजासारखा दुजा नाही त्रिभुवनी॥७॥

जीवालागी सार्‍या बंधनाची बाधा।
तूच परमात्मराजा,निवारी ही बाधा॥ध्रु॥
सद्‌गुरु परमात्मराजा तूच ब्रह्‌म एक ।
संकलशिष्यभक्तांचा तूच त्राता एक ॥१॥
आणिकांची चाले सत्ता केवळ काही क्षण।
तुझ्या कृपाप्रसादावीण आम्ही हीनदीन॥२॥
प्रभो,आमुच्यातील चैतन्य तूच एक आहे॥३॥
करावे अनुग्रहाने पतितांचे जीवन पावन।
संजीवन पर्वती तू आहे चैतन्याची खाण॥४॥

सद्‌गुरु परमाब्धिकार
परमात्मराज दर्शविती ओंकार
अकारादि मात्रा ह्‌या
करिती परमात्मराजास साकार॥ध्रु॥
वेदांचे उपनिषदांचे खोलून सत्य भाण्डार।
पळविती जीवांच्या देहातून व्यर्थ अहंकार ॥१॥
परमात्मराजावर माझी अलोट श्रद्धा आणि भक्ती।
सद्‌गुरुमंत्र सामर्थ्याने भरली अंगी शक्ती॥२॥

ऎसे माझ्या अंतरात भरावे रंग।
परमात्मराजा,तुम्ही भरावे रंग॥१॥
ऎसा मजला तुम्ही द्यावा संग।
जीवनी उठावेत शुद्ध तरंग॥२॥
सद्‌गुरु तुम्हाविणा मी न व्हावे दंग।
अन्यत्र कोठेही मी न व्हावे दंग॥३॥

नको आता कुठे जाणे येणे,नको येरझार।
परमात्मराजा,तुमच्या चरणी व्हावे उतार॥ध्रु॥
सद्‌गुरू,तुम्ही त्रैलोक्याचे सूत्रधार।
आम्हा शिष्यासी तुम्हीच आहात आधार॥१॥
तुम्ही आम्हीसी ज्ञानशिदोरी भरवावी।
देहाची स्थिती षट्‌चक्राकार करावी॥२॥
तुमच्या कृपेने फुलावी श्रद्धा,भावगंगा।
तुमच्या कृपेने लाभते सत्यज्ञानगंगा॥३॥