परमात्मराजांच्या ऎकाव्यात गोष्टी।
परमात्मराजांच्या सांगाव्यात गोष्टी॥१॥
परमात्मराजांचे पहावे रुप,गावे गुण।
परमात्मराजांच्या भजनी पाप क्षालन॥२॥
परमात्मराजांची सेवा न चुकवावी।
परमात्मराजांची पदधुळी ल्यावी॥३॥
परमात्मराजा सारिखा असता पाठीराखा।
तिळभरी न बाळगावी चिंता॥४॥
संसारात या तुझ्याच परमार्थ राहो।
सर्वत्र मला एक तुलाच पहाता येवो॥१॥
राहिला तर राहो तुझ्याच नामी श्वास ।
चराचरावरी तुझीच सत्ता खास॥२॥
माझे सर्वस हरावे परी मज जवळ करावे।
तुझ्या भजनी सत्संगी गुंतवावे॥३॥
परमात्मराज नको नको मज अव्हेरु।
परात्पर ब्रह्मास्वरुपा जगद्गुरु॥४॥
आम्ही भाग्यवंत भाग्यवंत।
परमात्मराजांनी धरला हो हात॥१॥
वाहात होतो भवमहापुरात।
उचलूनि घेतले हो त्यांनी नावेत॥२॥
आला पैलतिरी जाऊ हो निश्चित।
कळी काळासी नाही हो भीत॥३॥
माझ्या परमात्मराजा अनाथांच्या नाथा ।
कृपावंत दयावंत मुक्तिदाता ॥१॥
पूजा ध्यान सेवा तुझी घडो घडो।
बोध तुझा सतत कानी माझ्या पडो॥२॥
तुझ्याविन नाही नाही सुगती।
तुझ्या चरणाची ल्यायला मिळो माती॥३॥
तुझी चरणसेवा देई परमात्मराजनाथा।
तव बोधामृतच माझे भागवत गिता॥१॥
तव स्मरण राहो नित्य मम चित्ती।
तव सेवा,हीच माझी धर्म नीती॥२॥
तव अज्ञाभंग न घडो स्वप्नीही।
परमात्मराजा नाथा तूंच माझे सर्व कांही॥३॥
समर्थ परमात्मराजा गळो माझी अहंता।
तुझ्याविन कोणता। विचार नको॥१॥
राहिला तरी राहो तुझ्यासाठी देहो।
त्याविन मोहो । नको त्याचा॥२॥
जन्मासी घालावे तुला पाहाता यावे।
तुला ध्याता यावे । याचसाठी॥३॥
तुझी लीला गुण हेचि माझे जीवन।
सर्व समाधान । तुझे पायी॥४॥
देहभान विसरूनी पाहिला परमात्मराज।
दर्शन इच्छा धरूनी पाहिला परमात्मराज॥ध्रु॥
जीवन माझे परमात्मराजचरणी।
क्षेमकुशल हे परमात्मराजचरणी॥१॥
परमात्मराजचरणी सुगंध घेतो।
होई प्रपंच सुखाचा तिथे रंगता॥२॥
परमात्मराज दर्शनाचे योग।
घडावे असा मनात धरतो योग॥३॥
परमात्मराज असे सुखाचे स्थान।
याच्यातच असे भक्ताचे मन॥४॥
कर्म अर्पू या परमात्मराजचरणी।
वसती करू या परमात्मराजचरणी॥५॥
विसर न व्हावा परमात्मराजाचा।
सोहळा चाले परमात्मराजाचा॥६॥
भक्तिसोहळा परमात्मराजचरणी।
भक्ती चाले परमात्मराजचरणी॥७॥
परमात्मराज हा असे सर्वरूप।
सर्वतीर्थक्षेत्रातील हे रूप॥८॥
याच्या नामावीण जन्म व्यर्थ असे।
म्हणून भाव याच्या ठायी वसे॥९॥