You are here : Home >> Publications >> भाविक भावना (वार्षीकांक २००७) >> प. पू परमात्मराज महाराजांच्या विषयी काही भावप्रधान लेख

प. पू परमात्मराज महाराजांच्या विषयी काही भावप्रधान लेख

महाराजांनी मोठे काम केले

आज दिनांक(२०-५-२००७ ला) महाराजांची जयंती आपण सर्वांनी साजरी केली आहे.प.पू.परमात्मराज(राजीवजी) महाराजांना अभिवादन करीत आहोत.

महाराजांचे फार मोठे कार्य आहे.अशा दुर्गम ठिकाणी त्यांनी तपश्र्चर्या केली आहे. जी त्यांची जिद्द आहे ती फार मोलाची आहे. सर्वसामान्य मनुष्य जे कार्य करु शकत नाही ते जे करतात त्यांना आपण अवतार म्हणतो.

महाराजांचे मोठे कार्य करुन दाखवले आहे.म्हणून आपण त्यांना अवतारी समजतो.ते अवतारी आहेत,हे आता सिद्ध झालेले आहे.

श्री.जयनाथ महाराज
सरनोबतवाडी.

लोकल्याणासाठी महाराजांचे आगमन

परमपुज्य परमात्मराज उर्फ राजीवजी महाराज हे कोणी मानव नसून साक्षात भगवान श्रीकृष्ण आहेत. सर्याची तुलना जशी कोणी करीत नाही,तशी या महाराजांची तुलनाच करता येत नाही. लोकल्याणासाठी महाराज संजीवनगिरीवर येऊन राहीलेत व त्यांनी भाविकजनांचे कल्याण केले.त्यांनी आपला परमाब्धिग्रंथ हा भगवान दत्तात्रेयांच्या कृपेने लिहून प्रकट केला आहे

श्री.योगानंद महाराज
मठाधिपती,श्री दत्त संस्थान मठ,
तमनाकवाडा.

दर्शनाने जातो शीण

परमात्मराज महाराजांच्या फक्त दर्शनाकरीता आम्ही कारवार जिल्हयातून आलो आहे.त्यामुळे हे भाग्याचे दिवस आहेत.बॅटरी डाऊन झाली असल्यास करंट पाहीजे असतो,तो करंट इथे आहे.करंटमुळे पुन्हा बॅटरी चार्जिंग होते.हे सर्व आपले सदगुरु परमात्मराज महाराजांच्या कृपेने घडत आहे.

या महाराजांच्या दर्शनासाठी यायचे असेल तर आईच्या उदरातून जसे आम्ही उघडया अंगाने बाहेर येत असतो,तसे स्वच्छ मनाने यायला पाहीजे. स्वच्छ मनाने, उघडया मनाने जर परमात्मराज महाराजांचे दर्शन आम्ही घेतले तर अनंत जन्मीचाअ शीण जाईल,लाखो करडो पापे क्षणात नष्ट होतील.

श्री.संभाजी महाराज
कारावार.

सर्वांनी दर्शनाचा लाभ घ्यावा

श्रीगुरु परमात्मराज महाराजांच्या जन्म दिनोत्सवाच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या सर्वांना नमस्कार सदगुरु परमात्मराजांच्या दर्शनाने अर्मयाद फळ मिळते,कोटीकोटी जन्माचे पाप,ताप इत्यादी नाहीसे होतात.अनन्त जन्माचे देखील अज्ञान नाहीसे होते.म्हणून आपण सर्वांनी त्यांचे दर्शन घ्यायला पाहीजे व त्यांच्यांकडून ज्ञानाचा स्वीकार करुन मुक्त झाले पहीजेन.

श्री.मल्लिकार्जुन महाराज
बोरगांववाडी,ता.चिक्कोडी

उदात्त जीवनसरणीचे दान लाभले

किती सांगु कुणाला आज आनंदी आनंद झाला.अष्टमीच्या रात्री यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले.खरं त्यावेळचा त जो होता तो आपल्याला बघायला मिळाला नाही.पण परमेश्वराने काही आपल्याला कमी केलं नाही. भगवंताने आपल्याला उदंड आर्शिवाद दिले.जा तुला तो आनंदसोहळा बघायला मिळाला नाही ना,काळजी करु नकोस तुझ्याही वाटयाला तो आनंदसोहळा बघायला मिळेल आणि म्हणून की काय महाराज या ठिकाणी आले आणि खरंच तो गोकुळातला आनंदसोहळा इथे बघायला मिळाला.

महाराजांचा जो जन्मदिवस आहे तो एक आनंदसोहळा आणि परत्माराज महाराजांचं नित्य स्मरण म्हणजेच नित्य आनंदसोहळा आणि त्यांचे जे नित्य स्मरण त्यात समाधानाचे विश्व आहे.ते आपल्याला अनुभवावयास मिळतं.आणि म्हणून खर्‍या अर्थाने गोकुळ त्यावेळेलाही होतं आणि त्या भगवंताचा गोकुळाप्रमाणे अवतार इथे झालेला आहे म्हणून आपल्याला आपण खर्‍या अर्थाने भग्यवान समजलं पाहिजे की आपल्याला या जन्मामध्ये महाराजांचे दर्शन मिळालं,सहवास मिळाला.सहवास होणं नुसतं चालत नाही. महाराजांचा आपण स्वीकार केला,त्यांच्याजवळ आलो आणि त्यांनी जो काही आपल्याला उपासना मंत्र दिलेला आहे तो धारण करुन आपल्या जीवना मध्ये आपली खर्‍या अर्थाने कल्याणाची वाटचाल सुरु झालेली आहे. आणि म्हणून परमेश्वराचे जे आभार आहेत ते किती शब्दात मानायचे ते मला खरचं कळत नाही आहे.

मी एका ठिकाणी एक शब्द केला ऎकला तो शब्द होतो.’तपशील व्यवहारामध्ये तपशील चालतो.व्यवहारामध्ये तपशील बघतो नअ,या व्यवहाराचं काय झालं? पण महाराजांच्या जीवनामध्ये सुद्धा तपशील आहे.पण तो शब्द फोडलेला आहे.एका बाजूला तप आहे,एका बाजूला शील आहे.जीवनामध्ये तप असेल तर जीवनाला किंमत आहे.हे महाराजांनी त्यांच्या जिवनामध्ये दाखवून दिललं आहे म्हणून खर्‍या अर्थानं जर आपल्याला जीवन जगायचं असेल तर आपल्याला महाराजांच्या जीवनामध्ये जो त्यांनी आर्दश घालून दिलेला आहेत त्याकडे बघावे लागेल.जो मार्ग त्यांनी दाखविलेला आहे,तो अंगीकारावा लागेल.आपल्याला जीवनामध्ये महाराजांनी उदात्त जिवनसरणी दिलेली आहे.परमाब्धिच्या रुपानं नुसत्या आपल्यासाठी नाही तर जगासाठी त्यांनी एक जीवनसरणी दिलेली आहे.

जो मनुष्य सरळ असतो तोच स्थिर होऊ शकतो.जो स्थिर होऊ शकतो तो पुढे व्यापक होऊ शकतो आणि जो व्यापक झाला तो परिपूर्ण झाला आणि म्हणून महाराजांच अंतःकरण महाराजांचं मन,महाराजांची बुद्धी अशी व्यापक आहे.परिपूर्ण आहे म्हणून तिनं जगाला आता गवसणी घातलेली आहे.महाराजांनी स्वतःचे जीवन धन्य करुन घेतलेलेच आहे.आपल्याला आपल जीवन धन्य करण्यासाठी महाराजांनी आपल्याला अनेक प्रकारचे मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांनी परमाब्धिसारखा ग्रंथ निर्माण केलेला आहे.वेळोवेळी ते आपल्याला मार्गदर्शन करीत असतात.आपल्या अडी-अडचणी सोडवत असतात. त्यांच्या अंतःकरणामध्ये आपल्याला त्यांनी जागा दिलेली.आहे की तिथं कुठलाही भेदभाव नाही आहे.आपले दोष ते बघत नाही आहेत.ते सगळ्यांना आपल्या जवळ घेतात,प्रेमाणे बोलवतात आणि म्हणून मला एक फार सुंदर गाणं आठवलं की, ’या चिमण्यांनो परत फिरा घराकडे आपुल्या तिन्ही सांजा झाल्या.’

या विश्वामध्ये खर्‍या अर्थानं खरचं तिन्ही सांज झालेली आहे.तिन्हीं सांजेला काय होतं तर समजलं नाही ’दोरा आहे,दोरी आहे का साप आहे.’ तसं या विश्वामध्ये कुणाला काही समजेनासं झालेलं आहे.प्रत्येक संप्रदाय म्हणतो की माझे बरोबर आहे. प्रत्येक माणूस म्हणतो माझं बरोबर आहे,मग सगळ्यांचं जर बरोबर असेल तर जगामध्ये बरोबर उत्तर का येत नाही आहे.जगामध्ये सगळा आनंद का होत नाही आहे? जगामध्ये शांतता का निर्माण होत नाही?

अमेरिका,चीन,जपान इ.सगळे ’आमचं बरोबर आहे,’ भारत म्हणतो’आमचं बरोबर आहे.’संप्रदाय म्हणतात ’आमचं बरोबर आहे.’मग तुमचं सगळयांचं बरोबर आहे तर जगामध्ये आज भांडण का, कलह का, राग का,द्वेष का, मत्सर का?मोठ्ठी मोठ्ठी राष्ट्र मत्सरानी पछाडली कशी? आणि त्यांच्यावर रामबाण उत्तर म्हणजे हमखास गुण येणारं उत्तर म्हणजे आडी श्रेत्री,संजीवनी श्रेत्री या ठीकाणी झालेलं आहे.पाणी तयार आहे.घोडयांनी पाणी प्यायचं का नाही, ते घोडयांच्या हातात आहे.महाराजांनी सुंदर असं रामबाण औषध निर्माण केलेलं आहे.जर ते प्रत्येक मनुष्यानं अंगीकारलं जर ते प्रत्येक देशानं अंगीकारलं तर खर्‍या अर्थानं जगामधला सगळा कलह संपेल आणि परमाब्धिच्या रुपानं जीवांना,राष्ट्राला एक संजीवनी,औषध मिळेल की जेणेकरून या विश्वामध्ये आनंद आणेल.सगळीकडे आनंदी आनंद निर्माण होईल.

श्री.आबासाहेब देसाई
बी.फार्मा.,एम्‌.बी.ए
मालदन,ता.पाटण,जि.सातारा.