प. पू परमात्मराज महाराजांच्या विषयी काही अनुभववर्णनात्मक लेख

खूप मन:शांती लाभली

प. पू. श्री श्री परमात्मराज महाराजांच्या चरणी कोटी कोटी शिरसाष्टांग दण्डवत्‌ नमस्कार. त्यांय्चाविषयी मला आलेला अनुभव सांगत आहे.

पूर्वी मी फार मोठया मानसिक तणावाखाली होतो. कामांमध्ये अजिबात उत्साह नव्हता. रात्रभर झोप लागत नव्हती. परन्तु प. पू. श्री परमात्मराज महाराजांचे दर्शन घडल्यानंतर व त्यांच्याकडून मंत्र मिळाल्यानंतर मला खूप मन:शांती लाभली.

महाराजांच्या परमाब्धि ग्रंथामध्ये जगातील सर्व विषय आहेत. या ग्रंथाचे सर्वांनी पारायण करावे. त्यामुळे मन:शांती तर मिळेलच, अलौकिक अनुभव सुद्‍धा येतील. या ग्रंथाच्या प्रसाराने जगतामधील वाद, कलह नाहिसे होतील व सर्वजण समाधानात राहतील.

आफ्रिकेतील माझे सहकारी व मित्रमंडळींना परमाब्धि ग्रंथ वाचायला दिला. भाविक भावना अंकही वाचायला दिले. त्या सर्वांनी माझेकडून प. पू. श्री परमात्मराज महाराजांबद्दल आपुलकीने चौकशी केली व आडी येथे कसे जायचे, याची माहिती लिहून घेतली

प. पू. महाराजांच्या चरणी मी एकच प्रार्थना करतो की असाच नितांत आशीर्वाद माझ्या व माझ्या कुटुंबियांच्या पाठीशी राहो

॥ जय परेश सर्वायण ॥

श्री. प्रकाश ज. इंगवले
(चिफ इंजिनिअर)
केनाना शुगर कंपनी,
सुदान (आफ्रिका)

मेरा जन्म सार्थ हो गया
p>परमपूज्य परमात्मराज महाराज के बारे मे मै मेरी भावना को व्यक्‍त करता हूँ ।

में सारे भारत मे घूमा हूँ । लेकिन परमात्मराज महाराजजी के दर्शन होने से मेरा जन्म सार्थ हो गया । यहाँ आडी मे आकर उनको देखने मात्र से मेरा जन्म सार्थ हो गया । उनका जीवन केवल परोपकार के लिए है । उनकी रहनसहन सीधी साधी है । ऐसे व्यक्तिको मैने पहले कभी भी नही देखा था । उनका लिखा हुआ परमाब्धि ग्रंथ सबके लिए है । इस ग्रंथ के बारे मे हमारी मातृभाषा तेलगु मे मेरी भावना व्यक्त करता हूँ ।

परमाब्धि परमविश्व बुक्कु
इदि स्वदिविना वाळ्ळलकु,
विन्ना वाळ्ळलकु देवडु मंचिदि चेगलनु ॥
(परमाब्धि इस परम विश्वग्रंथ को पढने से, सुनने से भगवान्‌ अच्छा करता है ।

श्री. एस्‌. के. श्रीनिवास महाराज
वीरब्रह्‌मय्य्यागारि आश्रमम्‌, कडप्पा
(आंध्रप्रदेश)

जीवनात प्रगतीची वाट मिळाली

प. पू. परमात्मराज महाराज यांच्याकडे जात असल्यामुळे आमची भरपूर प्रगती झाली. उत्पन्न वाढले आम्ही सर्व कुटूंबीय सुखी व समाधानी आहोत. आम्हाला कोणतीही अडीअडचण आली तरी ती दूर होते. मानसिक समाधान आहे. कोणतीही चिंता नाही. अशीच कृपादृष्टी आम्हावर राहू दे, ही नम्र विनंती.

॥ जय परेश सर्वायण ॥

श्री. वैभव बाळासाहेब साळुंखे,
सैनिक नगर, लक्ष्मी टेक, बेळगांव.

प्रार्थनेचे फळ मिळत असते

माझ्या मुलगीला बाळंतपणाच्या वेळी मोठा त्रास होत होता. मनामध्ये सद्‌गुरु परमात्मराज महाराजांची आठवण करुन ‘मुलगीला होणारा त्रास कमी व्हावा व बाळंतपण व्यवस्थित होवू देत’ अशी प्रार्थना केली व तेव्हा पासून मुलगीला कोणताही त्रास किंवा अडचण आली नाही. बाळ ब बाळंतीण महाराजांच्या कृपेने सुखरुप आहेत.

श्री. शंकर ज्योती दिंडुर्ले,
बेनाडी.

इच्छा पूर्ण झाल्या

प. पू. परमात्मराज महाराजांच्या कृपाशीर्वादाने आलेला अनुभव सांगत आहे. मी गेल्या दोन वर्षापासून आडीला मधूनमधून जात असते. तेव्हांपासून घरामध्ये सुख नांदत आहे. परमात्मराज महाराजांच्याकडे जातेवेळी डोंगर चढताना सर्व मनातले विचार शांत होतात. व शरीरातले विकार दूर होतात. एक उत्साह निर्माण होतो. नवीन चैतन्य निर्माण होते.

सर्वात महत्वाची बाब म्हणजे माझ्या मनातील सर्व इच्छा परमात्मराज महाराजांच्या कृपाशीर्वादाने पूर्ण झाल्या आहेत. मनातील सर्व चिंता पूर्णपणे नाहिशा झाल्या आहेत. परमात्मराज महाराजांचे नाव घेऊन त्यांच्या नावानेच आमच्या प्रत्येक दिवसातील सूर्य उगवतो व त्यांच्या नावानेच सूर्य मावळतो. साक्षात परमात्मराज महाराज आमच्या घरी आहेत असं आम्हाला वाटते. असाच कृपाशीर्वाद आमच्यावर राहू द्यावा. आम्ही प्रत्येक पौर्णिमेला आडीला येत असतो.

सौ. रोहिणी रणजित ऐतवडेकर
नवीन वसाहत, चंदगड, जि. कोल्हापूर.

सर्व अडचणी दूर झाल्यात

परमाब्धिकार प. पू. परमात्मराज महाराजांना माझे कोटी कोटी प्रणाम व साष्टांग दंडवत.

मला सर्वांना सांगताना व भाविक भावना अंकामध्ये लेख देताना अत्यानंद होत आहे. परमात्मराज महाराजांच्या आशिर्वादामुळे व परमाब्धि ग्रंथ नित्य पठणाने माझे आज सर्वकाही बरे आहे. असाच आशिर्वाद आम्हा पाठिशी राहो, हीच श्री चरणी प्रार्थना.

मी शाहूवाडी तालुक्यात साळशी या गावी राहते. माझ्या काही बर्‍याच अडचणी होत्या. मी व माझी मुले रोज परमाब्धि ग्रंथ वाचतो. व आजही परमाब्धि ग्रंथ वाचत आहे. त्यामुळे माझ्या सर्व अडचणी दूर झाल्या आहेत. आम्हाला परमाब्धिचा प्रसाद मिळाला आहे. महाराजांच्या आशीर्वादाने व नित्य परमाब्धि ग्रंथ पठनाने आम्ही सगळी आज आनंदी आहोत.

पुन्हा परमात्मराज महाराजांना आमचा कोटी कोटी प्रणाम

श्रीमती मंगल सर्जेराव पाटील
मु. पो. साळशी, तालुका - शाहुवाडी,
जिल्हा - कोल्हापूर.

कृपेचा अनुभव घेतला

प. पू. परमात्मराज महाराज यांच्या बद्दल आलेला अनुभव लिहित आहे. गेले १ वर्षापासुन त्यांच्याकडे जात असतो. त्यांनी मला मंत्र दिला. त्या मंत्राने माझ्या मनाला शांती मिळाली व सर्व चिंतातून मुक्‍त झालो. घरी सर्वसुख समाधान आहे. हे सर्व महाराजांच्या कृपेने झाले. महाराज खरोखरच साक्षात दत्तात्रेय आहेत. त्यांना पाहिल्यानंतर मनाला शांती लाभते. मन शांत होते. अशीच कृपा माझ्यावर कायमस्वरूपी राहू दे. ही परमात्मराज यांचे चरणी नित्य नियमितपणे प्रार्थना.

सौ. सरस्वती कुंडलीक खेडकर
मु. पो. भालगांव, ता. पाथर्डी,
जि. नगर (महाराष्ट्र)

परमाब्धि:’ हा ग्रंथ मानवतेमध्ये सामर्थ्य निर्माण करण्यासाठी

जेजुरी येथील मल्हारी मार्तंण्ड देव संस्थानचा अभिप्राय

जय मल्हार

 

परम पूज्य परमात्मराज महाराज यांनी लिहिलेला ‘परमाब्धि:’ हा ग्रंथ विश्‍वाला विश्‍वशांतीचा संदेश देणारा, सर्व धर्मांना एका छत्राखाली आणण्यासाठी परमोच्च असा ग्रंथ आहे.

भारतासारख्या राष्ट्रांमध्ये मानवता, ऐक्य निर्माण करण्यासाठी - मानवतेमध्ये सामर्थ्य निर्माण करण्यासाठी हा ग्रंथ मानव जातीला उपयुक्‍त ठरेल. सर्वांना सुयोग्य जीवन जगण्यासाठी, ज्ञानाचा महासागर असणारा हा ग्रंथ भगवंताचा प्रसाद आहे.

या ग्रंथाच्या प्रसारासाठी श्री मार्तंड देव संस्थानच्या वतीने हार्दिक शुभेच्छा.

अशोकराव टेकवडे
माजी आमदार पुरंदर हवेली प्रमुख विश्‍वस्त
श्री. मार्तंड देवसंस्थापक जेजुरी

जगाच्या कल्याणासाठी परमाब्धिची उपलब्धी झाली

श्री क्षेत्र औदुम्बर येथील श्रीदत्त देवस्थान चा अभिप्राय

॥ श्री नृसिंह सरस्वती दत्त देव प्रसन्न॥

॥ नमामि सततं दत्तं औदुबरनिवासिनम्‌ ॥
॥ यर्तीद्ररुपंच सदा निजानंद प्रबोधदम्‌ ॥

श्री अनंतश्रीविभूषित प. पू. परमात्मराज महाराजांचे चरणी शिरसाष्टांग नमस्कार. एवढया महान ग्रंथाबद्दल अधिकार वाणीने अभिप्राय लिहिण्याची माझी योग्यता अजिबात नाही. तरी सुद्धा औंदुबर निवासी श्री. दत्त महाराजांचे कृपाशीर्वादाने चार शब्द सुचले ते प. पू. परमात्मराज महाराजांचे चरणी अर्पण करीत आहे.

परमाब्धि या महान ग्रंथाचे वाङ्‍मय क्षेत्र अतिशय मोठे आहे. हा ग्रंथ सत्य - सनातन आहे. प्रत्येक मानवाने आपल्या आयुष्यामध्ये हा महान ग्रंथराज वाचून आपले जीवन सार्थकी करुन घ्यावे, असे वाटते. हा महान ग्रंथराज बघितल्यानंतर एक गोष्ट दृष्टिक्षेपास आली ती म्हणजे भारतीय षड्‌दर्शन व मूळ परंपरेस कुठेही धक्का - इजा न पोहचता ह्या ग्रंथाचे लिखाण झाले आहे. प्रत्येक मानवाने आपले आचरण कसे करावे, याचे उत्तमप्रकारे आकलन होते.

परमाब्धि या ग्रंथाचे वाङ्‍मय क्षेत्र अतिशय मोठे आहे. श्रुति - स्मृति पुराणांमध्ये जे विषय सांगितले आहेत ते विषय मानवांना मार्गदर्शन करतात. मनुष्याच्या जन्मापासून मृत्युपर्यंत प्रत्येक क्षणाचा उपयोग कसा करावा, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेतो पर्यंतचे मार्गदर्शन ह्या ग्रंथात आहे.

संसारामध्ये सर्वत्र सुख - दु:ख. लाभ - हानी, जीवन - मरण, दरिद्रता - संपन्नता, स्वस्थता - आजारीपण, बुध्दिमत्ता - अबुध्दिमत्ता, इत्यादी विभिन्नता दिसते. कारण अशी अनेक उदाहरणे देता येतील की एकाच आई वडिलांचे पोटी जन्म घेतलेल्या दोन्ही मुलांचे शिक्षण, पालन पोषण एकाच स्वरुपाचे असले तरी व्यक्‍तिगत रुपाने त्यांची परिस्थिती अत्यंत वेगळी असते. जसे कोणी आजारी- कोणी आरोग्यवान, कोणी दरिद्री कोणी श्रीमंत, कोणास एखादा अवयव कमी-जास्त इत्यादी.

ह्या सर्व गोष्टींवरुन एकच स्पष्ट दिसते की जन्म जन्मांतरांचे अदृश्य कर्मभोगच ह्याचे कारण आहे. परमाब्धि या ग्रंथामध्ये अशा अनेक विषयांच्याबद्दल बरीच विस्तृत माहिती आली आहे.

मनुष्य प्राण्यांचे कल्याण कशात आहे, मनुष्य जन्माची इति कर्तव्यता कोणती व कशात आहे, सामान्य धर्म, विशेषधर्म, आपद्‌धर्म, स्वधर्म, सदाचार जीवन जगण्याची पद्धती, अतिथी सेवा, उपासना चारी पुरुषार्थ, ज्ञान, भक्‍ति, वैराग्य इत्यादी अनेक विषय भरभरुन दिलेले आहेत.

हा ग्रंथ म्हणजे वेद, उपनिषदे, भगवद्‍गीता, अशा अनेक ग्रंथांचे सार आहे. श्री दत्तगुरुंचे परम उपासक प. पू परमात्मराज महाराज यांचे चरणी दत्त गुरुंच्या आशीर्वादाने सुचलेला अभिप्राय ठेवत आहे.

॥ श्री गुरुदेव दत्त ॥

;p:श्री अनंत श्रीपाद जोशी
श्री दत्तक्षेत्र औदुंबर, ता. पलूस,
जि. सांगली पीन कोड. ४१६३२०