You are here : Home >> Publications >> भाविक भावना (वार्षीकांक २०१०) >> अभिप. पू. परमात्मराज महाराजांच्या विषयी काही भावप्रधान लेखराय

प. पू. परमात्मराज महाराजांच्या विषयी काही भावप्रधान लेख

हमे हृदय से समझना चाहिए

प्रात: स्मरणीय अर्चनीय वंदनीय परमश्रद्‌धेय परमात्मराजजी महाराज का धरतीपर अवतरण हुआ है ।

भगवान्‌ स्वयं गीता मे कहते है ‘जब जब आवश्यकता होती है, धर्म की ग्लानि होती है तब तब मै अवतार लेकर आता हूँ और समाज को भक्‍ति, ज्ञान, बैराग्य, धर्म आदि के बारे मे बताता हूँ, मै कब आता हूँ इसकी कोई तारीख निश्‍चित नही है ।

जिसप्रकार संत ज्ञानेश्वर, अक्कलकोट स्वामी आये उसीप्रकार परमात्मराज महाराज आए है । इस बात को समझना किसी बुदिधजीवी के बस की बात नही है । इसे समझने के लिए हृदय चाहिए । हर काम बुदि‌‌‌‍ध से नही होता, जब बुदिध और हृदय एक होते है तब समझना सरल है ।

इस धरतीपर जितने धर्मसंप्रदाय है उन सबको परमात्मराज महाराजजीने ‘परमाब्धि’ ग्रंथ है। यह ग्रंथ साक्षात्‌ परमात्मराज महाराज का वाङ्‌मय स्वरुप है ।

(दि. ३०/०१/२०१०)
ब्र. विष्णु चैतन्य महाराज
कैलास आश्रम, ऋषिकेश
उत्तराँचल.

परमात्मराज महाराज ने अपना कार्य किया है ।

‘सर्वज्ञ’ कहाँ जाता है, संत महापुरुषोंको और एक भगवान को । केवल विद्वानों को सर्वज्ञ नही कहाँ जाता । प. पू. परमात्मराज महाराजजी सर्वज्ञ है । उन्होंने विश्व के लोगों के लिए वैश्विक धर्म की स्थापनी की है - परमाब्धि ग्रंथ को लिखकर । अब इस वैश्विक धर्म का प्रसार करना यह भक्‍तो की जिम्मेदारी है ।

परमात्मराज महाराजजीने अपना कार्य किया है । अब गेंद भी और बल्ला भी भक्‍तो के हाथो मे है । सिक्स मारना है या बोल्ड होना है, यह भक्‍तों के ही हाथ मे है ।

॥ जय परेश सर्वायण ॥

दि. २९/११/२००९
ब्र. कल्याणजी महाराज
ऋषिकेश (उतराँचल)

आपण आपला उद्‌धार करुन घेऊ या

परमपूज्य परमात्मराज महाराजांनी संजीवन डोंगरावर राहून सिंहगर्जना केली आहे. त्यांची गर्जना ऐकून लाखो लोक त्यांच्याकडे येत आहेत, त्यांचे दर्शन घेत आहेत, त्यांच्या पायावर पडत आहेत आणि आपला उद्‌धार करुन घेत आहेत.

परमात्मराज महाराजांचं वैशिष्ट्य म्हणजे अवतारी पुरुषांचं वैशिष्ट्य.

धर्मसंस्थापनार्थास संभवामि युगे युगे (गीता) या वचनाप्रमाणे हे वैशिष्ट्य.

परमात्मराज महाराजांच्या समोर नुसंत बसलं तरी समाधी लागते.

परमात्मराज महाराजांचे हृदय हे लोण्यासारखं मऊ आहे. त्यांचे मन चंद्रासारखे शीतल आहे. त्यांचे बोलणे अमृताहूनी गोड आहे. त्यांचे ज्ञान हे सूर्याप्रमाणे अंधाराचा नाश करणारे आहे.

परमाब्धि ग्रंथ वाचल्यावर अज्ञान राहत नाही. परमात्मराज महाराजांच दर्शन घेतल्यावर आपण मुक्‍त झाल्याशिवाय राहणार नाही. होणारच. आणि हाच गुण त्यांच्या ‘परमाब्धि’ ग्रंथामध्येही आहे. या ग्रंथात सार्‍या विश्वाचे ज्ञान आहे.

आपण आधी अहंकार सोडू या, परमात्मराज महाराजांचा आशीर्वाद घेऊ या आणि परमाब्धितील ज्ञान घेऊन मुक्‍तीला प्राप्‍त करु या.

दि. (०१/०१/२००९)
श्री. विठ्‍ठल स्वामी
(पत्ता - प. पू. श्री. विठ्ठल स्वामीजी
बी. के. हळ्ळी, ता. हलियाळ, जि. कारवार)

प्रार्थनेचे फळ मिळत असते

माझ्या मुलगीला बाळंतपणाच्या वेळी मोठा त्रास होत होता. मनामध्ये सद्‌गुरु परमात्मराज महाराजांची आठवण करुन ‘मुलगीला होणारा त्रास कमी व्हावा व बाळंतपण व्यवस्थित होवू देत’ अशी प्रार्थना केली व तेव्हा पासून मुलगीला कोणताही त्रास किंवा अडचण आली नाही. बाळ ब बाळंतीण महाराजांच्या कृपेने सुखरुप आहेत.

श्री. शंकर ज्योती दिंडुर्ले,
बेनाडी.

संपूर्ण पृथ्वीतलावर परमाब्धिचा विषय पोहोचला पाहिजे

प. पू. परमात्मराज महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण इथे एकत्रित आलेलो आहोत. सर्वांच्या हितासाठीची वृत्ती प. पू. परमात्मराज महाराज यांच्या ठायी दिसून येते, प्रत्येक पौर्णिमेला व अन्य कांही निमित्ताने परमात्मराज महाराज आपल्याला मार्गदर्शन करत असतात. गुरु माऊलींच्या सान्निध्यात आपण आहोत. आपण त्यांच्या सान्निध्यात जास्तीत जास्त वेळ व्यतीत करु.

(दि. २०/०५/२०१०)
श्री. जनार्दन नामदेव पाखरे
(पत्ता - मान. जनार्दन पाखरे संपादक, ‘संत विभूती
त्रैमासिक’, बिरदेव वसाहत, कागल, जि. कोल्हापूर.)