You are here : Home >> Publications >> भाविक भावना (वार्षीकांक २००७) >> अनुभववर्णनात्मक लेख

अनुभववर्णनात्मक लेख

सुखी जीवनाकरिता कृपा लाभली
प.पू.परमात्मराज उर्फ़ राजीवजी महाराजांविषयी माझे मनोगत व्यक्त करतो.

आपले महाराज देवपुरुष आहेत.या जगात प्रत्येक भाषेत जेवढे चांगले शब्द आहेत ते सर्व शब्द महाराजांना लागू पडतात.हे सर्वच शब्द एखादा लिहीत बसला तर समुद्रातील पाण्यापेक्षा जास्त शाई लागेल.आकाशाएवढा पेपर पुरणार नाही.आणि हे सर्व लिहून झालेले साहित्य ठेवण्यासाठी पृथ्वी पुरणार नाही.

या थोर देवतारी पुरुषाचा सहवास आम्हांला १९९१ पासून लाभला.आम्हाला महाराजांचे पहिल्यांदा दर्शन लाभले त्याच वेळी आम्ही धन्य झालो.धन्य झालो.त्या धन्य होण्याला मोल नाही.महाराजांनी भक्तांच्या कल्याणासाठी इथेच अनुष्ठाने केलीत.त्यांनी इथे शुन्यातून विश्व निर्माण केले.सध्या भक्तांच्या सोयीसाठी सांस्कृतिक भवनाचे बांधकाम चालू आहे.

मला व घरातील. सर्वांना महाराजांविषयी भरपूर अनुभव आलेले आहेत.प्रत्येक अनुभव व्यक्त कसा करणार?प्रत्येक क्षण आम्हीं महाराजांच्या आशिर्वादाने जगत आहोत,त्यामुळे प्रत्येक क्षणाचा उल्लेख कसा कराणार?ते गरजेच नाही,शक्यही नाही.त्यामुळे मी थोडक्यात सांगतो. महाराजांच्या कृपेने बी.एस्‌सी.प्रथमश्रेणीत उत्तीर्ण झालो.मला डॉक्टर किंवा शिक्षक व्हायची इच्छा होती.मला डी.फ़ार्मसीसाठी कमी फ़ी मध्ये सहजरीत्या अ‍ॅडमिशन मिळाले.

मला आश्चर्य वाटले की मी खेडयातला साधा विद्यार्थी असूनही माझा कर्नाटकात नंबर बसून सुवर्णपदक प्राप्त झाले.ही महाराजांची कृपा होय.त्यानंतर औषध दुकान काढले.त्यानंतर सहजरित्या,जवळ कहीही पैसे नसताना बी.एच्‌.एम्‌.एस्‌.साठी अ‍ॅडमिशन प्राप्त झाले व आता ही पदवीही प्राप्त झाली आहे.सांगायचा उद्देश एव्ढच की,परिस्थिती नाजूक असताना,लग्न झालेले असताना,साडेपाच वर्षाचा अवघड कोर्स असतानासुद्धा मला हे सह्ज शक्य झाले.हे मात्र फ़क्त महाराजांच्या कृपेने झाले.आजरोजी ते पूर्ण झाल्यानंतर व्यक्त करीत आहे.दोन ते अडीच लाख रुपये खर्च असतांना महाराजांच्या कृपेने कुठलेही अडथळे न येता त्यातून पार पडलो,तसेच मी निर्व्यसनी राहीलो.

महाराजांच्या कृपेने आमचे सर्व कुटुंबीय व्यवस्थित आहे.मिळालेली.प्रत्येक गोष्ट व्यक्त केली जाऊ शकत नाही. सर्व भाविकांनी भक्तीने,श्रद्धेने,आत्मीयतेने महाराजांच्या सेवेसाठी तयार रहावे.फ़ळाची अपेक्षा ठेवू नये.यश नक्की मिळणार व मिळत राहील.

नतमस्तक होऊन हे चार शब्द दत्तचरणी अर्पण करीत आहे.हरि ॐ तत्सत्‌ श्री गुरुदेव दत्त॥

डॉ.संजय बाबूराव मिरजे
बी.एस्‌सी.,डी.फ़ार्म.,बी.एच्‌.एम्‌.एस्‌.,
बेनाडी,ता.चिक्कोडी.

स्वप्नातील शब्दांनी परिवर्तन घडले

प.पू.परमात्मराज उर्फ़ राजीवजी महाराजांच्या विषयीचा एक अनुभव इथे सांगत आहे.

इ.१९९१ मध्ये महाराज आडीला आल्यानंतर आडी येथील माझे स्नेही श्री.तानाजी दत्तोबा नाईक यांनी महाराजांच्या विषयी मला सांगितले.त्यानंतर मी महाराजांकडे जाऊन आलो.

मी पूर्वी मांसाहार करीत होतो.एके दिवशी सांगावला मांसाहार असलेल्या एका यात्रेला मला निमंत्रण होते.त्यामुळे मी तिथे जाणार होतो.तिकडे जाण्यापूर्वी मी सहज अंथरूणावर पडलो व मला झोप लागली.त्यावेळी स्वप्नात महाराज आले व मला म्हणाले ’ते सोडून द्या ’.ते शब्द मी पूर्णपणे पाळले व तेव्हापासून मी मांसाहार पूर्णपणे सोडून दिला आहे.

डॉ.दिनकरराव गणपतराव चौगुले
रा.कागल,ता.कागल,जि.कोल्हापुर.

रहस्यमय दर्शनाचा व संदेशाचा

प.पू.परमात्मराज उर्फ़ राजीवजी महाराजांच्या विषयी मला अनेक-अनेक अनुभव आलेले आहेत.त्यापैकी सुरवातीच्य़ा काळातील अनुभव सांगत आहे

  • इ.स.१९९१ मध्ये माझे थोरले बंधु डॉ.दिनकरराव गणपतराव चौगुले यांनी महाराजांच्या संबंधी मला सांगितले व ’तू दर्शन घेऊन ये’,असेही बोलले परंतु ,आज जगात साधूंची भरपूर संख्या आहे व त्यात नाना प्रकार चालू आहेत,असा विचार करुन माझे मन आडीला जाऊन येण्याकडे वळत नव्हते.परंतु,एक चमत्कारिक घटना घडली व मन बदलले.मी घरी असतानाचं मला महाराजांचे रहस्यमय दर्शन झाले.त्यानंतर मात्र आडीला जाऊन महाराजांचे लौकिकदृष्टीने पहिले दर्शन घेतले. घरी बघितलेले महाराजांचे रुप व आडीला जाऊन बघितलेले महाराजांचे रुप तंतोतंत एकच होते.
  • आमचे आई-वडिल दत्तभक्त होते.त्यामुळे आम्हां भावंडांमध्येसुद्धा आरंभापासुनच दत्तभक्ती आहे.नृसिंहवाडी येथे बारा वर्षांपर्यत दर पोर्णिमेला दत्तदर्शनाकरिता जाऊन येण्याचा विचार मनाशी पक्का केला होता.त्यानंतर सात वर्षे पूर्ण झाली होती.त्यानंतर पोर्णिमेला गेला असता एक अतिविशेष घटणा घडली.दत्तदर्शन घेवून ओवरीमध्ये जप करीत बसलो होतो.त्यावेळी संदेश आला की "तू आडीला जात रहा,मीच तिथे आहे.पुढची पाच वर्षे आडी येथे पुर्ण कर." त्यानंतर वाडीला येण्याविषयी काय करावे, असा विचार चालू असताना पुन्हां संदेश आला की "आधी आडी,नंतर वाडी." या रहस्यमय संदेशाचे पालन करण्यासाठी त्यापुढील ५ वर्षे प्रत्येक पोर्णिमेला मी आडीला महाराजांकडे जात होतो.त्यानंतरही वेळ मिळेल तेव्हां,नेहमीच महाराजांकडे जात असतो.

श्री.अशोकराव गणपती चौगुले
(एम्‌. एस्‌. ई.बी.) ,कागल.

अत्यंत शीघ्रतेने रोगमुक्त झालो

प.पू.परमात्मराज उर्फ़ राजीवजी महाराजांच्या विषयीचा मला आलेला अनुभव सांगत आहे.

१९९३ साली मार्च मध्ये माझे मानेच्या मणक्याच्या आजारासंबधित ऑपरेशन के.एल.ई.बेळगांव मध्ये झाले होते. ऑपरेशन करुन एक वर्षाचा कालावधी लोटला तरी मला होणारा त्रास २५% कायम होता.त्या बद्दल मी पुन्हा के.एल.ई.हॉस्पिटलमध्ये जावून,सर्जनची भेट घेवून विचारणा केली होती .पण "एवढ त्रास कायमच राहणार तो सहन करावेच लागेल." असे ते म्हणाले होते.त्यामुळे मी हैराण झालो होतो.योगायोगाने आडी येथील एका गृहस्थाच्या सांगण्यावरुन मी आडीला महाराजांच्या दर्शनासाठी आलो.महाराजांनी माझ्या व्याधीच्या निवारणासाठी दैवी उपाय सुचविला.तो केल्यामुळे आठ दिवसात माझे दुखणे पुर्णपणे बरे झाले व आजतागायत पुन्हा दुखले नाही.

मी इथे येत राहत असतो.माझ्यावरील सर्व कष्ट,दुःखाचे निवारण झाले आहे.माझ्या मुलीच्य़ा हृदयाचे ऑपरेशन सुरुळीतपणे पार पडले.हे सर्व श्री दत्तकृपेमुळे व महाराजांच्या आशीर्वादानेच झाले,असे मी पूर्ण विश्वासाने सांगू इच्छितो. मी व माझे मित्र श्री ज्ञानेश्वर वंटमुत्ते,असे आम्हीं दोघेही महाराजांच्या दर्शनासाठी नेहमी येत असतो.

श्री.महादेव मुरलीधर यंदे
घर नं.११०९,एस्‌.एस्‌.रोड,

काही आश्र्चर्यकारक घटना

प.पू.परमात्मराज महाराजांच्याविषयीचा मला आलेले काही अनुभव सांगत आहे.

  • प.पू.परमात्मराज महाराजांच्याविषयीचा मला आलेले काही अनुभव सांगत आहे.
  • १९९२ सालात आलेलाच आणखी एक अनुभव सांगतो.आडी येथील दत्त मंदीरात पाणी सहजपणे येण्यासाठी अर्धा इंची पाईपलाईनची गरज होती.त्यासाठी एक हजार रु.देतो,असे मी महाराजांना मी बोललो.त्यावेळी एक हजार रुपये देखील पुष्कळ वाटत होते.महाराजांजवळ तर बोललो,परंतु लवकरात लवकर देणे कसे शक्य होईल,याविषयी रात्री विचार करत होतो.परंतु आश्र्चर्य म्हणजे दुसर्‍याच दिवशी ऑफिसला गेल्यावर महागाई भत्त्याचा फरक मिळाला आणि मोजून बघितले तर ते बरोबर एक हजार रुपयेच होते.महाराजांकडे बोलल्यानंतर दुसर्‍याच दिवशी तेवढीच रक्कम हातात येण्याची ही घटना मला विशेषच वाटली.
  • दि.६-१०-१९९५ ला महाराजांच्या अनुष्टानाची समाप्ती होणार होती.आदल्याच दिवशी आम्हीं येतो,असे आम्हीं महाराजांना सांगितले होते.परंतु ५-१०-१९९५ ला महाराजांचा निरोप आला की,रात्री येऊ नका. ६ तारखेला सकाळी या. याचे कारण आम्हांला त्याच काही वेळानंतर कळून आले. ५ तारखेला रात्री उशीरा आमचे कणेरीवाडीतील पाहुणे कै.शामराव खोत यांना हार्ट अ‍ॅटॅक आला.त्यावेळी आम्हीं कागललाच असल्याने त्यांना ताबडतोब दवाखान्यात भरती केले,त्यांच्यावरील गंडांन्तर टळले.त्यानंतर ९ वर्षे म्हणजे इ.२००४ पर्यत ते सुखरुप जगले.
  • १९९५ मधील ही घटना माझ्या कायम स्मरणात राहिली आहे. त्यावेळी आमच्याजवळ मोबाईल फोनची सोय नव्हती.आडी डोंगरावार त्यावेळी लॅडलाईन फोनची नव्हता. आदल्याच दिवशी आडीला आलो असतो तर कणेरीवाडीहून निरोप मिळायला उशीर झाला असता व थोडयाशा विलंबानेही कदाचित फार मोठे संकट ओढवले असते. संकट टळल्यावर दि.६-१०-१९९५ ला सकाळी आम्हीं सर्वजन आडीला गेलो.
  • महाराजांविषयीची आणखी एक घटना सांगतो.आमच्या एल्‌.आय.सी.मधील विकास अधिकारी संघटनेचे अधिवेशन राजस्थानमधील उदयपूर येथे होते.तेथे जाण्यापूर्वी मी महाराजांकडून उदी घेऊन गेलो होतो.प्रवासदरम्यान एक प्रेक्षणीय स्थळ बघण्याच्या दृष्टीकोनातून माउंट आबूकडे जाण्याचा योग आला.अबू पर्वताकडे जात असताना वाटेल राणकपूर येथे थोडया विश्रांतीसाठी थांबलो.सायंकाळी साडेसहा-सात ची वेळ होती.मंद प्रकाश होता.रस्त्याकडे फिरत गेलो असताना तिथे काही मेंढया होत्या. त्यावेळी मेंढयांच्या वासाने एक वाघ आमच्यापासून १०-१५ फूट असतांना महाराजांचा धावा केला. तात्काळ तो वाघ आल्यापावली निघून गेला’ श्री दत्तगुरुच्या व परमात्मराज महाराजांच्या कृपेने माझ्यावरील गंडांन्तर टळले,अशी माझी पूर्ण भावना आहे.
  • आमच्या घरी प.पू.परमात्मराज उर्फ राजीवजी महाराजांचा फोटो पूर्वीपासून आहे.एक दिवस आम्ही महाराजांच्या फोटोपुढे उभे राहून इच्छा प्रदर्शित केली की."आम्हांला आईचे पहिले वर्षश्राद्ध करवायचे आहे.ते व्यवस्थित पार पडावे." आम्ही महाराजांच्या फोटोपुढे आपली इच्छा प्रदर्शित करुन फक्त दहा मिनिटेच झाली होती,तेवढयात श्री .दिपक मगरची आई आली च व "आम्ही मंडप वगैरे घालून सर्व कार्य व्यवस्थित पार पडतो."असे तिने सांगितले.वर्षश्राद्ध व्यवस्थित पार पडणार,असे वाटून आनंद झाला.एवढया शीघ्रतेने इच्छा पूर्ण होण्याचा हा प्रकार मला अत्यंत आश्र्चर्यकारक वाटला.
  • आम्ही महाराजांकडे आरंभापासूनच जात होतो.परंतु त्यावेळी काही लोक आम्हांला नाव ठेवत होते."यांना कामे नसतील,वेळ जात नाही म्हणून डोंगरात जात असतील"असे आमच्याविषयी म्हणत होते.परंतु लोक महाराजांचे कार्य व त्यांच्याविषयी आलेल्या अनुभवांमुळे आता पूर्ण अस्तिक बनले आहेत.

दिलीप गणपती चौगुले
(डेव्हलपमेंट ऑफिसर भारतीय जीवन बिमा निगम
कागल,जि.कोल्हापूर)