You are here : Home >> Publications >> भाविक भावना (वार्षीकांक २००९) >> अनुभववर्णनात्मक लेख

अनुभववर्णनात्मक लेख

परमात्मराज महाराजांच्या आर्शिवादाने जीवनात यशस्वी झालो

समस्त भाविकजनहो,

परमपुज्य परमात्मराज महाराज यांच्या चरणांना स्पर्श करुन माझे मनोगत लिहीण्यास सुरुवात करतो, मी माझे या साठी मांडत आहे की मला ज्याप्रमाणे प.पु.परमात्मराज महाराजांचे आर्शिवाद लाभले त्याप्रमाणे आपणासर्वांना त्यांचे कृपा आर्शिवाद मिळावेत व आपले जीवन सुखी समाधानी व्हावे ही इछा.

माझे मित्र डॉ. संजय मिरजे यांच्यामुळे मी इ.स. १९९१ मध्ये परमात्मराज महाराज यांचा पहिल्यांदा आर्शिवाद घेतला. तेव्हापासुन आजपर्यंत मी त्यांच्या सान्निध्यात आहे.मी अत्यंत गरिब कुटुंबात वाढलेला असल्यामुळे शिक्षण घेणे कठिण होते. पण परमात्मराज महाराज यांच्या प्रेरणेमुळे व कृपाआर्शिवादामुळे नेहमी शालेय जीवनात यशस्वी होत गेलो.शिक्षण घेत असतेवेळी अनेक वेळा अनेक प्रकारची संकटे आली नैराश्य आले पण त्यावेळी परमात्मराज महाराज यांच्या चरण स्पर्शामुळे मी संकटांना सामोरे जाऊ शकलो. मी माझे एस.एस.सी, पी.एच.डि सेट फक्त परमात्मराज महाराजांच्या आर्शिवादाने यशस्वी होऊ शकलो. प.पु.परमात्मराज महाराज यांचा कृपा आर्शिवाद नेहमी माझ्या कुटुंबावरती असल्यामुळे मी आज सुखी,समृद्ध व समाधानी आहे.

परमब्धि ग्रंथ हा सर्व समावेशक असा एकमेव ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये उच्च-नीच,गरीब-श्रीमंत,जात-पात असले कोणतेही भेदभाव आढळत नाहीत.हा ग्रंथ सर्व धर्म समावेशक आहे.तसेच या ग्रंथाचे लहानापासुन मोठ्यापर्यंत सगळेच वाचन करु शकतात.ज्यामुळे माणुस व्यापक असा विचार करु शकतो व त्यामुळे जीवन सुखी व समृद्ध होऊ शकते.

परमब्धि ग्रंथ हा विदयार्थ्य़ांनाही प्रेरणादायी असल्यामुळे मनोबल वाढण्यास उपयुक्त आहे. एकाग्रता वाढण्यास देखिल हा अत्यंत चांगला ग्रंथ आहे.या ग्रंथाचे सर्वांनी वाचन करावे अशी मी अपेक्षा व्यक्त करतो.

प्रा. डॉ.पंडितराव शिरगावे.
एम.एस्सी, पी.एच.डी
वनस्पतिशास्त्र विभागप्रमुख,
देवचंद महाविद्यालय, अर्जुननगर

नवसंजीवनी प्राप्त झाली

अचानक आलेल्या अडचणींमुळे व मानसिक नैराश्यातुन माझे मानसीक संतुलन पुर्ण बिघडले होते. माझे मलाच कळत न्हवते मी काय करते आणि काय नाही? व बाळाकडेसुद्धा पूर्ण दुर्लक्ष्य झाले होते. माझे डोके सतत दुखत रहायचे. ब‌र्‍याच डॉक्टरांची ट्रीटमेंट झाली पण माझी तब्येत जैसे थे.काहीच सुधारणा न्हवती.शेवटी मला मानसोपचार तज्ञांकडे दाखल करणार तेवढ्यात एका रात्री मला गुरुवारी १२.०० वाजता प.पु.परमात्मराज महाराजांचा दृष्टांत झाला व काही काळजी करु नका असे सांगितले. मी झोपेतुन जागी झाले व माझ्या डोळ्यातुन आपोआपच अश्रु यायला लागले व त्या दिवसापासुनच मला महाराजांच्या दर्शनाची ओढ लागली व त्यांचे दर्शन घेतल्यावर मी पुर्ण बरी झाले व आता मी व्यवस्थित आहे.हे शक्य झाले ते फक्त महाराजांच्या आर्शिवादाने. परमब्धि ग्रंथाच्या वाचनामुळे माझ्यात बराच बदल झाला. प्रत्येकाने आर्वजुन हा ग्रंथ वाचावा

॥ जय परेश सर्वायण॥

दि ८/४/२००९
स्मिता अमरदिप पाटिल
बी.एस्सी बी एड.
मु पो नांगनुर, ता. चिक्कोडी, जि बेळगाव.

अनुभुतीतुन सद्‌भावना व श्रद्धा वाढली

१८ जानेवारी २००९ चा दिवस आम्हाला अमृततुल्य वाटला.त्या दिवशी शाळेच्या स्नेह मेळ्यात विद्‍यार्थ्यांना आशीर्वाद देण्यासाठी परमात्मराज महाराज आले होते. प्रत्यक्ष सिद्ध पुरुष शाळेत आल्याचे समजताच अनेक भक्तगणही दर्शनासाठी आले होते.

एक प्रकारचे चैतन्यमय वातावरण सभामंडपात पसरले होते.पुण्याचे एक दांपत्य खास परमात्मराज महाराजांच्या दर्शनासठी आले होते. पंधरा दिवसापुर्वी अक्कलकोटच्या स्वामी समर्थ मंदिरात त्यांनी दोन दिवस सेवा केली होती. मुरगूड्ला आल्यानंतर प्रत्यक्ष दत्त दर्शन झाल्याचे व सेवा सफल झाल्याचे त्यांना वाटले.

महाराजांनी मुले व पालकांना उद्देशुन इंग्रजी मध्येच संपुर्ण प्रवचन केले.जीवनविषयक तत्वज्ञान आणि शालेय संस्काराचे महत्व त्यांनी तीस चाळीस मिनीटांच्या प्रवचनात अत्यंत सुंदर पद्धतीने विशद केले आहे.

त्यांचे इंग्रजी ज्ञान पाहुन सर्वांनाच सुखद धक्का बसला.इंजिनीअरींगची पदवी धारण करणा‍र्‍या महाराजांनी केवळ लोकांच्या कल्याणाकरता साधुव्रत घेतले आहे,हे भक्तांना समजल्याने त्यांच्यातील महाराजांच्याविषयीची श्रद्धा व आदरभाव द्विगुणीत झाला.

परमात्मराज महाराजांनी लिहीलेला परमाब्धि हा ग्रंथ तर परमपवित्र आहे.शाळेतील (न्यु इंग्लिश मेडियम स्कुल) सर्व शिक्षकांनी तो ग्रंथ बघितला(त्यामध्ये हिंदु, मुस्लीम,व ख्रिश्चनहि होते) आणि त्यांना आणखि एक सुखद धक्का बसला.या ग्रंथात हिंदु, मुस्लीम,युहुदी, पारशी,ख्रिश्चन अशा सर्व धर्मांची उत्पत्ती/स्थापना व तत्वज्ञानाची अतिशय सुंदर माहिती दिली आहे.या ग्रंथात विश्वधर्म आहे.

केवळ भक्तजनांच्या कल्याणासाठीच नव्हे तर जागतिक मानवधर्मा साठी जीवन समर्पित करणा‍र्‍या परमात्मराज महाराज यांना कोटि कोटि प्रणाम

दि २/०३/२००९
प्राचार्य वि.रा.भोसले
अध्यक्ष
ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्था, मुरगुड

महाराजांनी दिलेल्या मंत्राचा प्रभाव अनुभवला

॥ श्री गुरुदेवाय दत्तत्रेयाय नमः॥
॥ श्री गुरुदेवाय परमात्मराजाय नमः॥

काही कारणाने मला कामात खुप त्रास होत होता. एके दिवशी आडीला गेलो.महारांना माझा त्रास सांगितला. महाराजांनी मला आशिर्वाद दिला व एका कागदावर मला जप लिहुन दिला. त्यानंतर मी पुण्याला आलो. जप चालु ठेवला. रोज सकाळी मी जप करीत होतो.पहिल्याच महिन्यात कामात प्रगती झाली.वरिष्ठ खुष झाले आणि माझी प्रगती होत गेली.

त्यानंतर जपाचा प्रभाव वाढतच गेला. त्यानंतर मी यु. ए. ई मध्ये गेलो. त्यानंतर आज मी यु.के मध्ये आहे.

प.पु परमत्मराज महाराजांनी दिलेल्या आशिर्वादामुळे आणि त्यांच्या कृपे मुळे सर्व काही व्यवस्थित चालले आहे.आत कसलिही काळजी वाटत नाही.

जाऊन जाऊन कोठे जाईन
या धरतीलाही सीमा आहे॥
जाईन तेथे महाराजांचा आशिर्वाद
असावा हिच एक इछा आहे॥

श्रीधर आनंदराव नाईक
बेक्ख्म्पटन, मार्लबोरो(Marl borough)
विलशायर एस.एन ८ ।QR (इंग्लंड)

आशीर्वाद लाभला व काम पूर्ण झाले

परमपूज्य परमात्मराज महाराज यांचे चरणी शी.सा.न.वि.वि.मला आलेला अनुभव सांगत आहे.मी एक वेळी एक आर्थिक व्यवहार केला होता.२ लाख रु.सस्कार म्हणून दिले होते.परन्तु उर्वरित रकमेची व्यवस्था कशी करावी,हे मला समजत नव्हते.माझी झोप उडाली होती.त्यावेळी महाराजांना येऊन भेटलो.महाराजांनी माझ्याकडे एक नजर टाकली व ’काम होऊन जाईल ’असे म्हणाले.

आश्चर्य म्हणजे दुसर्‍या दिवशीपासून अनुकूल घटना घडू लागल्या व एक महिन्यात माझे काम झाले.दि.२८।५।२००९ ला सदरचा व्यवहार पूर्ण केला.

प्रशांत वसंत पेडणेकर
८६२/ई-९६,सुर्वेनगर,
कळंबा रिंग रोड,कोल्हापूर.

शांती मिळाली

माझ्या जीवनातील शांती पूर्णपणे हरवली होती.सांसरिक जिवनातील मोठे संकट निर्माण झाले होते.अशा अव्यस्थेत अक्कलकोटच्या एका धार्मिक व्यक्तीने मला प.पू.परमात्मराज महाराजांचा फोटो दिला व सांगितले की ’या फोटोचे तुम्ही दर्शन घेत जा.सदगुरु महाराज अशक्य ते शक्य करतील.संकट दूर करतील.’

खरोखरच माझ्या जीवनात पुन्हा आनंद आला.संकट टळले.परमात्मराज महाराजांच्या दर्शनाचा हा चमत्कारच आहे.

परमात्मराजांच्या फोटोचे दर्शन घेतले तर माझ्या जीवनात आनंद भरला.त्यांचे प्रत्यक्ष दर्शन घेतल्यावर किती आनंद मिळेल,याचे मी एक पामर काय वर्णन करू?

प.पू.परमात्मराज महाराजांना माझा दण्डवत.

सौ.प्रतिभा कैलास ढगे
यमुनानगर,निगडी पुणे.

शीघ्र अनुभव प्राप्ती

मेरा नाम स्टॅन्ली जोसेफ । मै एक इसाई(ख्रिश्चन) हूँ । केरला के तिरुअनंतपुरम्‌ जिले के कुचवेली ग्राम का रहनेवाला हूँ । रेल्वे मे नोकरी करता हूँ । अभी महाराष्ट्र मे काम कर रहाँ हूँ ।

मेरे जीवन मे कुछ समस्याएँ थी । लेकीन परमपूज्य परमात्मराज महाराजांचा फोटो की पूजा शुरु करने के बाद जो समस्याएँ, थी वह दूर हो गयी। मैने घर में और रेल्वे ऑफिस मे भी महाराजजी का बडा फोटो लगाया है । फोटो की पुजा करते रहने से मुझे आनंद आता है।

सभी जाती,सभी धर्म,सभी सम्रदायो के लोगों के लिए कल्याणकारक जो वैश्र्विक मंत्र(जय परेश सर्वायण) है उस मंत्र का मै हररोज जाप करता हूँ। जाप करने से मुझे बोहत समाधान मिलता है।

परमपूज्य परमात्मराज महाराजजी ने लिखे हुए परमाब्धि ग्रंथ को मेने देखा । इस ग्रंथ के बारे मे मेरी मातृभाषा मलयालम्‌ मे अपनी भावनाएँ व्यक्त करता हूँ।

"परमाब्धि सत्यमागन्नु।परमाब्धि इल सत्यमागन्नु ॥
वैश्र्विकमंत्र एल्लरकम्‌ इद नल्लद आगन्नु।
एनिके नल्लद बोले अनुभव किटीटूँड॥"

इसका मतलब है -"परमाब्धि सत्य है। परमाब्धि मे सत्य है। वैश्र्विकमंत्र सभी के लिए अच्छा है।मुझे बहुत अच्छे अनुभव मिले है।"

मैने बहुत जगह पर परमात्मराज महाराजजी के फोटो लगाने का काम किया है। ता.१७।१।२००९ को आडी मे आकार मैने महाराजजी के दर्शन का अनुभव प्राप्त किया है।

स्टॅली जोसेफ
कुचवेली,जि.तिरुअनंतपुरम्‌
(केरल)

परमात्मराज महाराजांचे विचार भारावून टाकणारे

परमाब्धिमध्ये बोधामृत तुडुंब भरले असून त्यात महाराजांनी जगत्‌ कल्याणाचा हेतू चित्रत केला आहे.अनेक चांगल्या गुणांची त्यात समष्टी आहे.विज्ञान युगातील अध्यात्म म्हणजे ’परमाब्धि:’. वेदवाड्‌‍:मयापासून संतवाड्‌:मयापर्यंतची समृध्दी या ग्रंथात आढळते.’जय परेश सर्वायण’ हा सर्वधर्मसमभाव दर्शविणारा हा वैश्र्विक महामंत्र परमाब्धिमधून महाराजांनी विश्र्वाला दिला आहे.

परमात्मराज महाराज हे दत्तात्रेय अवतार आहेत.त्यांच्यावर दत्तकृपा झाली आहे.ज्ञानदेवांची ’ज्ञानेश्र्वरी’ तुकारामांची ’गाथा’,रामदासांचा ’दासबोध’ तसा परमात्मराज यांचा ’परमाब्धिः’.परमाब्धि वाचल्यावर दिव्यत्वापुढे मानव विनम्र झाल्याची प्रचिती येते.

कर्तव्य भ्रष्टांना आपल्या कर्तव्याची जाणीव व्हावी असा परमाब्धितील बोध आहे.श्रमाला प्रतिष्ठा देऊन जीवनातील सुख-समाधान-ऎश्वर्य मिळवावे असा संदेश या ग्रंथातून मिळतो.परंतु त्या ऎश्वर्यादीचा अहंकार झाला तर अधःपतन अटळ आहे.हा मौलिक विचारही मिळतो.म्हणून परमाब्धिः हा परमार्थाकडे जाणारा व मार्ग दर्शविणारा ग्रंथ आहे आणि म्हणूनच पुरातन काळातील संतांचे जणू प्रतिरुप परमात्मराज महाराज आहेत,यात मुळीच शंका नाही.

एकदा आमच्या क्रांतिवीर संगोळी रायण्णा डी.एड्‌.महाविद्यालयाचे संस्थापक-अध्यक्ष मा. लक्ष्मणराव चिंगळे सर यांनी अक्कोळ येथे एका धार्मिक कार्यक्रमात परमाब्धिकार परमात्मराज महाराज यांना आमंत्रित केले होते.महाराजांच्या दिव्य सानिध्यात हा कार्यक्रम संपन्न झाला.महाराजांच्या पदस्परर्शाने हा परिसर पुनीत झाला. महाराजांनी आपल्या शुभाशीर्वादरुपी प्रवचनात अनेक धार्मिक दाखले देवून धर्म विचार मांडले. जीवनाकडे पाहण्याचा समर्थ आणि निश्चयात्मक दृष्टीकोन दिला.आपल्या विचाराने सर्वांना मंत्रमुग्ध केले.डी.एड्‌.चे प्रशिक्षणार्थी,शिक्षक,प्राध्यापक,संस्थेचे सभासद,ग्रांमपंचायत सदस्य आणि सर्व ग्रामस्थ महाराजांच्या विचाराने भारावून गेले.

प्राचार्य एम.आर.ढेकळे
B.Sc.(Hons),M.A.M.Ed.
डी.एड्‌.कॉलेज,अक्कोळ..

इच्छापूर्ती झाली

प.पू.परमात्मराज महाराज महाराज यांच्याबद्दल आलेला अनुभव लिहीत आहे.

एक वेळेला घरच्या समस्यांसाठी परमात्मराज महाराजांच्याकडे जायचे असे ठरवून मी आडीला गेले.माझा मुलगा नागपूरला होता.६ ते ७ वर्षे झाली तरी परत आला नव्हता,रागावला होता.माझा मुलगा परत माझ्याकडे यावा म्हणून महाराजांना विचारले,परमात्मराज महाराजांनी मला एक उपाय दिला तो मी काटेकारपणाने केला आणि काय आश्चर्य,नागपूरला गेलेला मुलगा परत आला.

परमात्मराज महाराज म्हणजे आक्षात शिर्डी साईबाबा,स्वामी समर्थ,शेगावचे गजानन महाराज,चिले महाराज इ.सर्व आहेत.परमात्मराज महाराजांच्या कृपेने सर्व व्यवस्थित आहे.महाराज खरोखर मानवी अवतार घेऊन आडी डोंगरात राहत आहेत.ते साक्षात एक मुखी दत्तच आहेत.जे काम ६ ते ७ वर्षे मी वाट पाहून झाले नाही ते काम महाराजांच्या कृपाशीर्वादाने झाले.काही थोडयाच दिवसात महाराजांनी केले.अशीच कृपा महाराजांची माझ्यावर व पूर्ण कुटुंबावर असू दे.

॥ जय परेश सर्वायण॥

सौ.सुरेखा वसंत अस्वले
मु.पो.आंबा घाट,
ता.शाहूवाडी,जि,कोल्हापूर.