Serving the needs of the Comman Man

Temple Hour's

Monday - Friday: 9:30am - 12:30pm | 5:30pm - 8:30pm

Saturday - Sunday: 9:00am - 8:30pm

Daily Aarti: 12:00pm and 7:30pm

Welcome to our site!

Shree Datta Devasthan, Adi is a holy place situated in the middle position of the hill named "Sanjivan Giri". This hill is situated in the area of the village Adi(Aadi)
Taluka : Chikkodi, Dist. : Belgaum.

img-02

परमाब्धिपरिक्रीडनावश्यकता

  • ‘परमाब्धि:’ या सर्वजनकल्याणकारक परमबोधसमुद्रात पूर्ण समर्पित भावनेने क्रीडा करणे म्हणजे परमाब्धिपरिक्रीडन होय. ‘‘परमाब्धि’ चे असीम स्वरुप समजून घेण्यासाठी त्यात विहार करणे म्हणजे परमाब्धिपरिक्रीडन होय. परमाब्धिमध्ये अवगाहन करुन परिशुद्‌धतेची प्राप्ती करुन घेणे म्हणजे परमाब्धिपरिक्रीडन होय. म्हणूनच असीम कल्याणासाठी सर्वांनी परमाब्धिपरिक्रीडन करावे.
  • ज्याप्रमाणे मुखाने सेवन केले असता शरीराचे सर्व अवयव तुष्ट होतात, त्याप्रमाणे परमाब्धितील बोधामृताचे श्रद्‍धाजिव्हायुक्‍त भावमुखाने प्रस्वादान केले असता भावशरीराचे सर्व अवयव संतुष्ट होतातच. तरीसुद्धा निजभावशरीराच्या सर्व अवयवांची परमाब्धिबोधामृताच्या साक्षात्‌ परिपूर्ण सान्निध्यात येण्याची रसपूर्ण मनीषा पूर्ण करण्यासाठी सर्वांनी परमाब्धिपरिक्रीडन करावे
  • ‘परमाब्धि:’ या सद्‍गेही (सद्‍गृही) परिक्रीडन केल्याने साधकांना सद्‍गेषण, सद्‍गेपन व सद्‍गेवन घडते. सत्तत्व परिपूर्णत: गवसणे, सद्‍बोध परिपूर्णत: गवसणे म्हणजे सद्‍गेषण होय. सत्तत्त्वाकलनामुळे रोमांचित होणे, सद्‍बोधाचे जीवनात अनुसरण करीत राहणे म्हणजे सद्‍गेपन होय. सत्तत्त्वसेवा करणे, सद्‌बोधसेवा करणे म्हणजे सद्‌गेवन होय. अशाप्रकारे सद्‍गेषण, सद्‍गेपन व सद्‍गेवनाची परमदिव्य प्राप्ती करुन घेण्यासाठी सर्वांनी ‘परमाब्धि:’ या परमदिव्यसमुद्रात परिक्रीडन करावे.

आमची उपलब्ध प्रकाशने

भाविक भावना 2008

भाविक भावना 2009

भाविक भावना 2010

भाविक भावना 2015

पॉलिपॅथिक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल निर्माण कार्य

हार्दायन, श्रीदत्त देवस्थान मठ, श्रीक्षेत्र आडी मार्फत परमात्मराज अधिष्ठान, वंदूर (ता. कागल, जि. कोल्हापूर) या ट्रस्टच्या माध्यमातून वंदूर येथे शंभर बेडचे पॉलिपॅथिक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल निर्माण कार्य हाती घेतले आहे. येथे भाविकांनी आपल्या परीने आर्थिक स्वरूपात, वस्तूरूपात, श्रमरूपात साहाय्य केले, करीत आहेत. अनेक दानशूर अशा व्यक्ती आर्थिक साहाय्य करीत आहेत. काही महिन्यांपूर्वी इमारतीच्या दुसऱ्या मजल्याच्या स्लॅबचे काम झाले आहे. गिलावाही पूर्ण झाला आहे. फरशी, दरवाजे, खिडक्या, कलर व इतरही अनेक आवश्यक कामे होणार आहेत. एकूण तीन एकर क्षेत्र असल्याने पार्किंग व इतरही महत्त्वपूर्ण कामांसाठी एवढी जागा पुरेसी आहे. अनेक भाविकांच्या सहयोगातून सुयोग्य वेगाने हे निर्माण कार्य चालू आहे.

♦ Get In Touch ♦

Shree Datta Devasthan Math, Adi

Scroll to Top