परमाब्धि

🪷🪷🪷 परमाब्धि 🪷🪷🪷

परमाब्धि ग्रंथाविषयी परमपूज्य परमात्मराज महाराजांनी एकदा प्रकट केलेले काही विचार - सध्या जातिधर्मसंप्रदायांच्या मुद्यांवरून प्रचण्ड तणावपूर्ण वातावरण आहे. शांती भंग पावली आहे. प्रचण्ड हिंसाचार फोफावला आहे. परन्तु या परिस्थितीमध्ये बदल होणे तर गरजेचे आहे. त्याकरिता विविध जातिधर्मसंप्रदायांच्या लोकांमध्ये परस्पर सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण होणे गरजेचे आहे. 'परमाब्धिः' हा ग्रंथ पूर्वकाळात होऊन गेलेल्या विविध धर्मांमध्ये, संप्रदायांमध्ये समन्वय प्रस्थापित करून सर्व मानवांना ऐक्यस्थानी आवाहन करीत आहे. या ग्रंथाविषयी हिंदूधर्मान्तर्गत विविध संप्रदायांमधील अनेक साधुसंतांनी व इतर विद्वानांनी आपले पूर्णसमर्थनपर अभिप्राय आतापर्यन्त व्यक्त केलेले आहेतच, त्यासोबत ख्रिश्चनमुस्लिमादिवर्गांमधील अनेक मान्यवरांनी देखील आपले पूर्ण समर्थनपर अभिप्राय व्यक्त केले आहेत. (विविध वर्षांच्या भाविक भावना अंकांमध्ये साडेतीन हजारांहून जास्त मान्यवरांचे अभिप्राय प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत.)

परस्परांविषयी संघर्षमय पार्श्वभूमी असलेल्या हिंदूमुस्लिमख्रिश्चनादिवर्गांमधील मान्यवर व्यक्तींचे 'परमाब्धिः' ग्रंथासंबंधाने कसे काय एकमत झाले आहे, असा प्रश्न काहींना पडू शकतो. परन्तु याचे सुस्पष्ट व निःसंदिग्ध उत्तर परमाब्धि वाचनानंतर सहजपणे मिळत असते.

कोणी हिंदूत्त्ववादी असोत, बायबलवादी असोत, इस्लामवादी असोत, धर्मनिरपेक्षतावादी असोत किंवा अन्य कोणत्याही प्रकारच्या मतांशी संबंधित असोत, त्यातील प्रत्येकाला सखोल वाचन केल्यावर मान्य होईल, आवडेल असा हा परमाब्धि ग्रंथ आहे.

पृथ्वीने आजवर धर्माधर्मांमधील जातिजातींमधील, पंथापंथांमधील संघर्षामुळे अत्यन्त भीषण अनुभव घेतले आहेत. स्वतःच्या लेकरांच्या रक्ताचे पूर तिच्यावरून वाहले आहेत. 'आता हे सगळे थांबावे व विविध जातिधर्म-पंथांमध्ये विखुरलेली आपली सगळीच लेकरे सुखाने राहावीत व आपल्याला दिव्यशांतियुग अनुभवायला मिळावे, अशी रास्त इच्छा पृथ्वीने बाळगण्यात कोणाची हरकत असण्याचे कारणच असू शकत नाही.

म्हणूनच परमाब्धिमध्ये असलेल्या सर्वजनकल्याणमूलक विचारांचा प्रसार जनतेमध्ये सातत्याने होण्याची आता नितांत आवश्यकता आहे. परमाब्धिप्रसार हा सर्वजनहितकारक विचारांचा प्रसार आहे. या प्रसारकार्यात विविध धार्मिक वर्गांमधील साधुसंत, विविध राजकीय पक्षांमधील नेते, साहित्यिक तसेच इतरही क्षेत्रांमधील मान्यवरांच्या सहभागाची मोठी आवश्यकता आहे. अधिकाधिक मात्रेत माननीय व्यक्तींची अनुकूलता या प्रसार कार्यासाठी लाभत राहणे महत्त्वाचे आहे.

(चेयान या पुस्तिकेत परमाब्धि ग्रंथाच्या सार्वत्रिक व सार्वकालिक महत्वासंबंधाने जे विस्तृत वर्णन आहे तेही सर्व भाविकांनी अवश्य वाचावे.) (परमाब्धि ग्रंथाचे प्रकाशन विजयादशमी ला झाले होते याविषयी भाविकांना कल्पना आहेच.)

♦ Get In Touch ♦

Shree Datta Devasthan Math, Adi

Scroll to Top