वर्तेट

🌼🌹 वर्तेट 🌼🌹

'वर्तेट' ग्रंथाविषयी प्रकाशनाच्या निमित्ताने ग्रंथकर्ते परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी व्यक्त केलेले मनोगत -
'वर्तेट' हा अध्यात्मविषयावरील ग्रंथ आहे. आध्यात्मिक क्षेत्रात जे समजून घ्यावयाचे अनेकानेक विषय असतात त्या सगळ्या विषयांची उकल भाविकांना यातून होईल. या ग्रंथाला 'वर्तेट' हे नांव कां देण्यात आले आहे, हे सुद्धा हा ग्रंथ वाचायला सुरू केल्यावर समजून जाईल.

'ब्रह्मदेव, विष्णू व शिव' ही रूपत्रयी, दत्तगुरू तसेच इतरही दैवतरूपांपैकी कोणत्याही रूपाची आराधना करणाऱ्या प्रत्येक सद्भक्ताने हा ग्रंथ वाचायलाच पाहिजे, असे या ग्रंथाचे स्वरूप आहे. हा ग्रंथ पुन्हा पुन्हा वाचल्यावर या ग्रंथाविषयीचे प्रेम सर्व सद्भक्तांच्या अन्तःकरणामध्ये वाढत राहणार आहे. देवींपैकी कोणत्याही देवीची आराधना करणाऱ्या सद्भक्तांनाही हा ग्रंथ निश्चितपणे आवडेल.

सर्व जातींमधील, सर्व सम्प्रदायांमधील, सर्व धर्मविशेषांमधील अध्यात्मप्रेमी भाविकांमध्ये हा ग्रंथ नेहमी वाचत राहण्याची तीव्रतम ओढ निर्माण होऊन ती ओढ सातत्याने टिकून राहील, असा अदम्य व सर्वजनहितकांक्षी विश्वास आहे.

आधुनिक विज्ञानाच्या दृष्टिकोणातून आध्यात्मिक विषयांचा अभ्यास करू इच्छिणाऱ्यांना सुद्धा हा ग्रंथ अतिशय लाभदायक ठरेल.

या 'वर्तेट' ग्रंथाला पूर्णतः वाचल्यावर सर्व भाविकांना वरील विविध विधानांची अत्यन्त गोड अनुभूती येईल. भद्रपद (कल्याणरूप पद) प्रदान करणाऱ्या आध्यात्मिक सिद्धान्तांचे वर्णन असलेल्या या 'वर्तेट' ग्रंथाचे प्रकाशन भाद्रपद पौर्णिमेला झाले आहे, हाही एक अत्यन्त चांगला असणारा परममांगल्यप्रदायक योग आहे.

[ वर्तेट ग्रंथ प्रकाशन तिथी - भाद्रपद पौर्णिमा शक १९४१ ( दि.१३/९/२०१९)]

♦ Get In Touch ♦

Shree Datta Devasthan Math, Adi

Scroll to Top