सत्पोष

🌷🌺 सत्पोष 🌷🌺

सत्पोष ग्रंथाविषयी प्रकाशनाच्या निमित्ताने ग्रंथकर्ते परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी व्यक्त केलेले मनोगत -

'सत्पोष' या ग्रंथात आत्मा, अंतःकरण, इच्छा, आशा, भावना, धारणा इत्यादी अनेकानेक विषयांसंबंधी सिद्धान्तरूप विचार आहेत.

सत्पोष या ग्रंथामध्ये लिहिलेल्या अनेकानेक ऋषिमुनी, राजे इत्यादींच्या जीवनामधील घटना सर्वजनांसाठी प्रेरक ठरणार आहेत. अनेकानेक सत्पुरुषांच्या संबंधातील दृष्टान्त हे सामाजिक एकतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. वैज्ञानिक दृष्टिकोणातून केलेली वर्णने धर्मश्रद्धायुक्त भाविकांप्रमाणेच विज्ञानप्रिय व्यक्तींनाही आनंद देणारी ठरतील.

'सत्पोष' या ग्रंथाच्या वाचनाने नाना शंकाकुशंका दूर होतील. सर्वांना सहज समजेल अशी भाषा असल्यामुळे सर्वांनीच या ग्रंथाचा पुरेपूर उपयोग करून घेणे सर्वांसाठीच हितावह ठरेल. जगभरातील अनेकानेक प्राचीन संस्कृतींशी संबंधित उदाहरणे मानवांमध्ये एकत्वाची भावना निर्माण होण्यासाठी अत्यन्त उपयुक्त ठरतील. आध्यात्मिक क्षेत्रात वाटचालीसाठी आवश्यक असलेले अनेकानेक महत्त्वपूर्ण सिद्धान्त या ग्रंथात आलेले असल्यामुळे हा ग्रंथ सर्वसामान्यांपासून मोठमोठ्या विद्वानांपर्यन्त-म्हणजेच सर्वांसाठीच अतिशय उपयुक्त ठरणार आहे. [ सत्पोष ग्रंथ प्रकाशन तिथी - फाल्गुन शु. षष्ठी शक १९३९ ( दि.२१/२/२०१८) ]

♦ Get In Touch ♦

Shree Datta Devasthan Math, Adi

Scroll to Top