शिप्रोत

🪷🌼 शिप्रोत 🪷🌼

'शिप्रोत' ग्रंथाविषयी प्रकाशनाच्या निमित्ताने ग्रंथकर्ते परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी व्यक्त केलेले मनोगत

पारमार्थिक जीवनात तसेच व्यावहारिक जीवनातही अत्यन्त उपयोगी अशा भरपूर विषयांनी भरलेला 'शिप्रोत' ग्रंथ हा भाविकांच्या हातात प्रथमतः गुरुपौर्णिमेच्या दिवशी आला आहे, हा अत्यन्त महन्मंगलयोग आहे.

या ग्रंथात जीवनप्रवासासाठी आवश्यक असलेले अत्यन्त उपयुक्त नियम आहेत, जीवनाचे अस्तित्व योग्यरीतीने टिकवून ठेवण्याच्या बाबी आहेत. या ग्रंथात जीवनाचे मंगलमय पारमार्थिक उत्थान घडविणाऱ्या बाबी आहेत, जीवनातील अत्यावश्यक मांगल्यासाठीचे उपाय आहेत, जीवनाला पवित्र बनविण्याची साधने आहेत.

या शिप्रोत ग्रंथात भाविकांना जीवन सामर्थ्याच्या विविधरूपांचे दर्शन होईल. जीवनातील नाना संकटांवर मात करून पुढे पुढे चालत राहण्याची व इष्ट साध्य प्राप्त करण्यासाठीची प्रेरणा देणारा हा ग्रंथ आहे.

ऋषिमुनी, पुण्यश्लोक राजे इत्यादींपासून सर्वसामान्य माणसांपर्यन्तच्या जीवनातील विशेष घटना भरपूर मोठ्या प्रमाणात या ग्रंथात असल्यामुळे त्या दृष्टान्तरूप घटना जनजीवनामध्ये अत्यन्त चांगले परिवर्तन घडवून आणणाऱ्या आहेत.

या शिप्रोत ग्रंथात परमाब्धि ग्रंथातील काही मुद्यांचे अत्यन्त विस्तृत असे स्पष्टीकरण भाविकांना लाभेल. सर्वजातिधर्मपंथांच्या लोकांना अत्यन्त अत्यन्त आवडेल, असेच या शिप्रोत ग्रंथाचेही स्वरूप आहे.

जीवनरक्षाविषयक मुद्दे, जीवनाची हानी करणाऱ्या अनिष्ट बाबींचा त्याग, जीवनात आवश्यक अशा निश्चयाचे स्वरूप, जीवनाच्या विविध कार्यांमधील सूत्रबद्धता इत्यादी भरपूर विषयांनी तुडूंब भरलेला हा शिप्रोत ग्रंथ आहे.

या ग्रंथामध्ये विविधप्रकारच्या रक्षणप्रक्रिया, शिक्षणप्रक्रिया तसेच इतरही बहुविध प्रक्रियांविषयीचा सुबोध अन्तर्भूत आहे. आपल्या अन्तःकरणातील विविध भावनांपैकी योग्य भावना कोणत्या ते ओळखणे, भावनांचे संतुलन राखणे, योग्य भावनांना अन्तःकरणात विशेषत्वाने स्थापित करणे, योग्य भावनांचा मेळ बसविणे इत्यादी बाबीं विषयी अत्यन्त विस्तृत माहिती भाविकांना या शिप्रोत ग्रंथात वाचायला मिळेल व त्या माहितीचा जीवनात अत्यन्त उपयोग होईल.

जीवनात आवश्यक असलेली मनःशान्ती, साधनेतील उन्नतीसाठी जीवनाचा वापर, हृदयातील ओलावा, बोधप्रकाश इत्यादी अनेकानेक मुद्यांविषयी विस्तृत माहिती या ग्रंथाद्वारे लाभल्याने भाविकांना निश्चितपणे अतीव आनन्द होईल.

आत्मतत्त्व, जगत्, भवरोगचिकित्सा शाळा इत्यादी इतरही भरपूर विषय या शिप्रोत ग्रंथात आहेत. या ग्रंथात विविध धर्मपंथांमधील साधुसंतांच्या संबंधानेही वाचायला मिळेल. इथे फक्त ग्रंथातील काही बाबींचा उल्लेख केला. शिप्रोतमध्ये काय आहे, हे समजून घेण्यासाठी प्रत्येकाने स्वतः शिप्रोत वाचन करायला पाहिजे. विविध जीवनावश्यक विषयांनी ओतप्रोत भरलेला हा शिप्रोत ग्रंथ प्रत्येकाने वाचावा असाच आहे. शिप्रोत या ग्रंथनामाचा अर्थ काय आहे, अशी जिज्ञासा पुष्कळशा भाविकांमध्ये उत्पन्न होऊ शकेल. ग्रंथ उघडून बघितल्यावर 'शिप्रोत' या नामाचे सगळे मंगलमय अर्थ भाविकांना कळून जातील, शिप्रोत वाचनाचा अतीव उत्साहाने शुभारम्भही होऊन जाईल. [ शिप्रोत ग्रंथ प्रकाशन तिथी - गुरुपौर्णिमा शक १९४६ ( दि.२१/७/२०२४)]

♦ Get In Touch ♦

Shree Datta Devasthan Math, Adi

Scroll to Top