परमाब्धिपारायणावश्यकता

  • ’परमाब्धिः’ ग्रंथातील वाक्यांचे पुनः पुनः विशुद्ध व सखोल चिन्तन करीत राहणे म्हणजे परमाब्धि परिचिन्तन होय.या ग्रंथातील विविध विषयांचे परिपूर्ण आकलन होण्यासाठी हे आवश्यक आहे.जागात सौख्याचे,सौमनस्याचे वातावरण निर्माण व्हावे.कल्याणकारक विचारांचे वारे सर्वत्र सर्वदा वाहत राहावेत,सम्पूर्ण जीवसृष्टी परितुष्ट व्हावी,यासाठी सर्वांनी परमाब्धिपरिचिन्तन करावे.
  • या विश्र्वात शब्दसृष्टीही आहे व अर्थसृष्टीही आहे.शब्दसृष्ट्‌युत्पादक सर्व मूलभूत धातूंना व अर्थसृष्ट्‌युत्पादक सर्व मूलभूत धारणांना परमाब्धिने स्वतःमध्ये सामावून घेतले आहे.यातील सर्व श्ब्द व अर्थ हे सर्वांच्या कल्याणासाठी आहेत.म्हणूनच सर्वांनी परमाब्धिपरिचिन्तन करावे.
  • या परमाब्धिरुप वाक्सृष्टीमध्ये सर्वजनहिताच्या दृष्टीने मूलसर्जकता,सद्‌भावरक्षता व दुर्भावनाशकता आहे.यात शुद्धास्तित्त्वता,शुद्धाधिचालकता विद्यमान आहे.यात सर्वमहत्ता,सर्वसुहृत्ता व सर्ववियत्ता आहे.यात सर्वसर्गसंव्याप्ती,सर्ववर्गसंव्याप्ती व सर्वभर्गसंव्याप्ती आहे.जगातील पुष्कळशे लोक एकत्त्वाचा विचार आपल्या धारणेनुसार त्रित्वरुपात जरी करीत असले तरी सुद्धा एकत्त्व हे नित्य्सिद्ध आहे.हे पूर्णतः कळून घेण्यासाठी सर्वांनी परमाब्धिग्रंथाचे परिचिन्तन करावे.
  • ब्रह्मा,विष्णू व महेश हे रुपत्रय,श्रीगुरुदेव दत्तात्रेय,तसेच अन्यही सर्व विग्रहांद्वारे,ऋषी,मुनी,सिद्ध,प्रेषित इत्यादी नावांनी ओळखल्या जाणार्‍या सर्व संभूतींद्वारे जी तपस्या कालौघात घडली ती तपस्या जगन्मांगल्यासाठी जगद्‌वासीयांना पारमार्थिक प्रेरणा देण्यासाठी आहे.या समष्टितपस्येकडे पाहिले असता एक गोष्ट विशेषत्वाने लक्षात येते ती ही की-"आज जगभर धर्मांधतेचे,पंथाधतेचे,धनमदांधतेचे,सत्तामदांधतेचे जे निर्लज्ज व क्रूर चाळे चालू आहेत त्याकडे पहत राहणे या समष्टितपस्येकरिता आता असह्य झाले आहे.ते बंद व्हावेत अशीच तिची इच्छा आहे."या इच्छेच्या पूर्तीकरिता सर्वांनी परमाब्धिपरिचिन्तन करावे.
  • जगाला इष्ट असा सद्‌बोध प्रदान करणारा व अनादिकाळापासून अनंतकाळापर्यंत सर्वांकरिता एकच असा वैश्र्विक धर्म आहे.परन्तु देशकालपरिस्थितीनुसार कालौघात या एका वैश्र्विक धर्माचेच आंशिक आंशिक असे प्रकटीकरण होत गेले व त्या प्रकटीकरणांनी अनेक विशिष्ट धर्म वा संप्रदायांचे रुप धारण केले.त्या विविध प्रकटीकर्ण प्रक्रियांम्धील बाह्यभिन्नतेलाच कवटाळून बसल्याने विविध धर्म संप्रदायांमधील जनांमध्ये तीव्र संर्घष झालेत व चालू आहेत.ते दूर व्हावेत म्हणून सर्वदेशकालपरिस्थितीमध्ये सुस्थिर असणार्‍या धर्मसिद्धांतांना परमाब्धिच्या अध्ययनाद्वारे मानवांनी समजून घेणे आवश्यक आहे.परमाब्धिप्रतिपादित वैश्र्विक धर्माशी संलग्न होणे म्हणजेच अखिलमानवजातीकरिता असलेल्या कल्याणकारक विचारांशी सलग्न होणे होय.म्हणूनच सर्वांनी परमाब्धिपरिचिन्तन करावे.
  • पूर्वी जगात विशिष्ट धर्म वा सम्प्रदाय स्थापण होत असताना त्या त्या वेळी मूळ हेतू शांतिमूलकच होता. परन्तु त्या त्या पंथातील पश्र्चात्कालीन काही लोकांनी केवळ पांथिक अभिनिवेशापोटी आपले कलहकारक विचारच जनतेमध्ये पसरविण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे शाश्वत सत्य बाजूलाच राहिले.केवळ बाह्य बाबींनाच विशिष्ट व विचित्र अस्मितादर्शक प्राधान्य मिळू लागले.त्यांचा परिणाम असा झाला की वितण्डांच्या ज्वालांमध्ये मानव ऎक्य जळून खाक झाले.परन्तु आता परमाब्धिमध्ये मोठया आनंदाने आशेने पुनर्जीवित झालेल्या मानव ऎक्याला या दृश्य जगात पुढे प्रत्यक्ष बघावयाचे असल्यास प्रत्येक मानवाने परमाब्धिग्रंथाचे परिचिन्तन करावे.
  • मानवसमुह हा कालौघात भरपूर गटांमध्ये विभागल्या गेला आहे.आज तुलनेने वा कमी अधिक व्याप्ती असलेल्या पुष्कळशा हिंदूत्ववादी संघटना आहेत.त्या संघटनांमध्ये हिंदुत्व या मुद्यावर एकमत असेल तरी अन्य काही मुद्यां विषयी मतभेद आहेत.हिंदूमधील जाति,पंथ,भाषा इत्यादींच्या आधारांवरही पुष्कळशा संघटना आहेत.त्यामुळे हिंदूजनबळ मोठया मात्रेत विभाजीत झाले आहे.याशिवाय बायबलवादी,इस्लामी व इतर धर्ममतविषयक संघटनांमध्येही जातीपंथादिकांच्या आधारावर फूट आहेच.सध्या निधर्मी म्हणून प्रचलित असलेल्या विविध संघटनांमध्येही विविध जातिधर्मविषयक मुद्यांवरुन व अन्य काही मुद्यांवरुन मतभेद दिसून येत असतातच.अशा प्रकारे जगात आज हजारो संघटना अस्तित्त्वात आहेत.परन्तु संम्पूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी या सर्व संघटनांची एक संघटना ’सर्वजनकल्याणभाव’ पातळीवर निर्माण होण्यासाठीचा सुदृढ सैद्धान्तिक आधार परमाब्धिने प्रधान केला आहे.त्यामुळे या हाजारो संघटनांपैकी कुठल्याही संघटनेशी संबंधित असलेल्या वा नसलेल्या व्यक्तीने परमाब्धिचे सद्‌भावपूर्वक सखोल अध्ययन केल्यावर ’परमाब्धि’हा जगातील सर्वांच्याच हितासाठी आहे,अशी भावना त्या व्यक्तीमध्ये निर्माण होणे स्वाभाविक आहे.म्हणूनच सर्वांनी परमाब्धिपरिचिन्तन करावे.
  • कालौघात धार्मीकदृष्टया विविध वर्गांमध्ये विभागलेल्या लोकांनी बाह्यभेदांच्या आधारांवर वेगवेगळ्या प्रकारचे विश्र्वास मनात जोपासले आहेत.त्यापैकी अंधविश्र्वासांना उचित स्थान देऊन व त्यांचे एकसूत्रीकरण करुन सर्वजनविश्र्वासार्ह असा परमाब्धिग्रंथ निर्मीला आहे.म्हणूनच सर्वमानवांनी आपल्या जीवनाचा उचित उपयोग करुन घेण्यासाठी या ग्रंथाचे परिचिन्तन करावे.
  • आयुष्यरुप सर्व श्र्वासपीठांमध्ये,शरीररुप सर्व निवासपीठांमध्ये,मनोरुप सर्व श्रवणमनन निदिध्यासनांगीकृत प्रदिध्यासपीठांमध्ये,बुद्धिरुप सर्व अभ्यासपीठांमध्ये,उद्‌बोधनरुप सर्व व्यासपीठांवर,,निजशोधनरुप सर्वन्यासपीठांवर,कार्यस्फुरणरुप सर्व प्रयासपीठांवर, भावमिलनरुप सर्व समासपीठांवर सार्वत्रिक कल्याणासाठी सर्वजनकल्याण्कारक अशा परमाब्धिग्रंथाचे परिचिन्तन होत राहणे आवश्यक आहे.याचाच आशय असा आहे की सर्वांनी सर्वदा सर्वत्र परमाब्धिपरिचिंतन करावे.
  • सर्व स्थानसदुपयोगरुप प्राधिकरणांनी,सर्वविध ज्ञानप्रकरणांना,सर्वविध सुसंवेगरुप अलंकरणांना,सर्व सद्‌भावालयरुप अतःकरणांना,सर्व धर्मविशेषांच्या कालौघातील उचित संस्करणांना,सर्व विविध संप्रदायरुप धर्मपरिष्करणांना,सर्वविध तत्त्वव्याकरणांना,सर्व साधनरुप करणोपकरणांना व सर्व साध्यरुप उरीकरणांना परमाब्धिग्रंथाने आपल्या उरात सामावून घेतले आहे. परमाब्धिमध्ये शाश्र्वतधर्ममूल्यांचे जीवनीकरण आहे,संघनीकरण आहे,सबलीकरण आहे,सरलीकरण आहे व विशुद्ध प्रकटीकरण आहे.व्यर्थ वितण्डोत्पादक मुद्यांचे यात निराकरण आहे,भस्मीकरण आहे..कालौघात विकेन्द्रित झालेल्या महाव्यवस्थेचे मूळ उद्देशानुसार पुनःकेंद्रीकरण आहे.परमाब्धिमध्ये अभिनव प्रेरक मुद्यांने अभिनव आविष्कारण आहे.विविध गटांमध्ये विभागलेल्या सर्व मानवांचे एकत्रीकरण आहे.म्हणूनच सर्व मानवांनी ’परमाब्धिः’ या सद्‌धर्म ग्रंथाचे परिचिंतन करावे करावे.
  • सद्‌धर्मविरोधकांनी कालौघात सद्‌धर्मावर केलेल्या प्रचण्ड आघातांमुळे सद्‌धर्म शरीराचे विविध अवयव इतस्ततः विखुरले गेले होते.त्यातून उद्‌भवलेल्या मर्यादित उपलब्धतेमुळे एक एका गुणधर्मरुप अवयवालाच किंवा काही थोडया अवयवांनाच पूर्णधर्म म्हणून समजण्याचे भरपूर प्रकार कालौघात घडलेत.परन्तु आता परमाब्धिमध्ये सर्वसद्‌गुणधर्मरुप अवयव एकत्रित येऊन परिपूर्णतः परस्परसंयुक्त झाल्यामुळे महासंजीवन प्राप्त झालेला सद्‌धर्म सर्वासाठी प्रकट झाला आहे.या सद्‌धर्माचे परिपूर्णस्वरुप समजून घेण्यासाठी सर्वांनी परमाब्धिपरिचिंतन करावे.
  • आज मानवसमुदाय हा अभिनायक अवस्थेत आहे.कारण धर्मांध किंवा पंथाध टोळ्यांकडून केवळ भौतिक वर्चस्वासाठी जेव्हा कसार लागलेल्या ढिसार विचारांचा मारा सर्वसामान्य जनतेवर केला जातो तेंव्हा जनता त्या संसर्गजन्य कसाराने ग्रासली जाते.तो भयानक कसर ठेवत नाही.जनतेमध्ये वेगाने फैलावलेला वैचारिक कसार दूर करण्यासाठी परमाब्धि प्रसार होणे गरजेचे आहे.एक वेळ अशी येईल की सर्व मानवांना ’परमाब्धि ’ आपल्याकडे अतीवस्नेहाने ओढून घेईल.परन्तु तोपर्यन्त धीर धरुन चालत राहणे चांगले.कारण चांगल्या कार्यात काहीजन अडथळा आणण्याचा प्रयत्न करीत असतात.जगातील राक्षसी वृत्ती या नेहमी सद्‌धर्माच्या विरुद्ध वर्तन करण्यास तजबेज असतात.अशाप्रकारे राक्षस वृत्तींने निर्दलन अभ्यासकांकडून होणे आवश्यक आहे.म्हणूनच पुढील काळात सर्व क्षेत्रांमध्ये परिपूर्ण औचित्याचे दर्शन व्हावे,यासाठी सर्वांनी परमाब्धिपरिचिंतन करावे.
  • साम्प्रतकाळातील एक अनुचित प्रकार असा आहे की केवळ पांथिक दुराग्रहामुळे कालबाह्य विचारांना कवटाळून बसलेले लोक प्रचण्ड मोठया मात्रेत आहेत.परन्तु मुदत संपलेली औषधे ज्याप्रमाणे निकामी झाल्यावर टाकून द्यावी लागतात त्याप्रमाणे कालबाह्य झालेले विचार टाकूनच द्यावे लागतात त्या विचारांना दुराग्रहजन्य कवच प्रदान करणे योग्य ठरत नाही.जगाला सर्वकालोपयोगी विचारांची सर्वकाळ आवश्यकता असते.परमाब्धिमधील विचार हे सर्वकाळांकरिता सुयोग्य असून त्या विचारांनी सर्वपंथादिकांच्या मुलभूत विचारांना स्वतःमध्ये सामावून घेतले आहे .परमाब्धिमध्ये नित्यनूतन स्वरुप असणारे सर्व विचार नित्यनूतन पद्धतीने मांडण्यात आलेले आहेत.हए सर्व काही समजून घेऊन सद्‌धर्माशी संलग्न राहण्यासाठी सर्वांनी परमाब्धिपरिचिंतन करावे.
  • सद्‌धर्माचे रहस्य पूर्णपणे जाणून न घेता विविध विचारसरणींमधील काही भौतिकसुखमदाधीन दुराग्रही,कुटिल व्यक्तींनी आज सम्पूर्ण जगापुढे असंख्य जटिल प्रश्न निर्माण केलेले आहेत.जगाला मृत्यूच्या दारात आणून बसवले आहे.त्यामुळे त्या मतांध व्यक्तींकडून त्यांची मतांधता पूर्णपणे संपेपर्यंत परमाब्धिचा पूर्णतः स्वीकार होणे अवघड आहे.या कारणाने ज्या अनुचित प्रवृत्तींना परमाब्धिविषयी अनुचित प्रतिक्रिया व्यक्त करण्याची इच्छा असेल त्यांनी तसे करण्यापूर्वी प्रथम ’परमाब्धि:’हा ग्रंथ पुन्हा पुन्हा वाचून काढावा व समजून घ्यावा.त्यामुळे त्यांचेही मतपरिवर्तन होऊ शकेल.कारण दुर्जनांचेही रुपान्तर सज्जनांत व्हावे,सज्जनसंख्या वाढत राहावी,हे तर परमाब्धिग्रंथाचे एक खास प्रयोजन आहे.त्यामुळे सर्वांनीच सद्‌ग्रंथाचे परिचिंतन करावे.
  • ’सत्‌’ हा शब्द मूलचैतन्यस्वरुपाकरिता आहे,अशी धर्मशास्त्रगर्जना आहे.सत्‌ हा शब्द सर्व चांगल्या बाबींकरिता आहे.जगातील सर्व सत्पुरुष हे गुढपातळीवर एकसत्प्रामाण्यवादीच आहेत,हे सर्वांनी समजून घेतले तर गटागटात चालणार्‍या कलहांचे कारणच उरणार नाही.म्हणून हे परिपूर्णतः ज्ञात होण्यासाठी सर्वांनी परमाब्धिपरिचिंतन करावे.
  • अज्ञानामुळे जीवांना जो जन्ममरणचक्र प्रवास घडतो तो टाळण्यासाठी म्हणजेच बंधनाचा फास पुन्हा पुन्हा आवळल्या जाऊ नये म्हणून सर्वांनी परमाब्धिशी संलग्न व्हावे.भवसागराशी असलेली सलग्नता तोडण्यासाठी व कल्याणबोधसागर अशा परमाब्धिशी संलग्नता निर्माण करुन ती सदृढपणे टिकवून ठेवण्यासाठी सर्वांनी परमाब्धिपरिचिंतन करावे.