You are here : Home >> Publications >> भाविक भावना (वार्षीकांक २०१०) >> प. पु. परमात्मराज महाराजांच्या विषयी अनेकांनी लिहीलेली भक्तिगीते

प. पु. परमात्मराज महाराजांच्या विषयी अनेकांनी लिहीलेली भक्तिगीते

परम सत्य हे जाणोनी ।
जीव शिव एक करोनी ।
एकाग्रता अनुसंधानी ।
वाचावा परमाब्धि ॥१॥
रती असो नाम रुपी ।
तदाकार स्वस्वरुपी ।
निर्विकार चित्तरुपी ।
ध्यावा हा परमाब्धि ॥२॥
माया मोह बिनटण्या ।
अनुहती दंग होण्या ।
देह गेही मुक्‍त होण्या ।
जाणवा परमाब्धि ॥३॥
अब्धीच्या अपार लहरी ।
अनंत कोटी रुप हरि ।
सोहं सिद्‍धांसी हृदयी धरी ।
ग्रंथ हा परमाब्धि ॥४॥

स्वामी सागरानंद सरस्वती
(पत्ता - प. पू. स्वामी सागरानंद सरस्वती
१) श्री. स्वामी सागरानंद सरस्वती आश्रम
श्री क्षेत्र त्र्यंम्बकेश्वर जि. नाशिक (महाराष्ट्र)
२) प्रमुख महंत, आनंद आखाडा
अलाहाबाद (प्रयाग) (उत्तरप्रदेश)

एक दो तीन चार ।
मत करो समय बरबाद ॥१॥
पाच छ: सार आठ
नित्य करो परमाब्धिपाठ ॥२॥
नौ दस ग्यारह बारा
वही संत जो मन को मारा ॥३॥
तेरह चौदह पंद्रह सोलह लो
जय परेश सर्वायण बोलो ॥४॥
सतरा अठराह उन्नीस बीस
घर घर मे बोलो परेश ॥५॥

स्वामी जगदीश्वरानंद महाराज
(पत्ता- प. पू. स्वामी जगदीश्वरानंदजी महाराज
जंगमवाडी मठ, वाराणसी)

पाहिले पाहिले सद्‍गुरु पाहिले
गाईले तयांना भजन गाईले ॥धृ॥
करुणेची दृष्टि राजीवलोचन
पाहू त्यांना जाता भरु येई मन
भक्‍ताचिये भेटी परब्रह्‌म आले
भक्‍तांना भेटाया सद्‌गुरु धावले ॥१॥
नको तीर्थयात्रा, नको ते प्रयास
व्यर्थ कष्टामाजी जीव कासावीस
सद्‌गुरु चरणी सर्व उमजले
अनंत विभूति एकात गवसले ॥२॥
सद्‌गुरु चरणी लागो नित्य ध्यास,
हीच तळमळ हीच एक आस
निर्गुण निराकार साकार ते झाले
भक्‍त भगवंत एकरुप पावले ॥३॥
सद्‌‍गुरु चरणी ठेविलासे माथा
जीवन जयांचे अभंग ती गाथ
संसाराचे त्रिविध ताप पळूनिया गेले
जीव-शिव दोहोचेही कोडे उकलेले ॥४॥

सुश्री साध्वी सिंधु गणेश कुलकर्णी २८४, डी वॉर्ड, गंगावेश, कोल्हापूर.

लागावी परमाब्धिची गोडी ॥ध्रु॥
परमाब्धि हा सौख्याचा सागर ।
परमाब्धि हा मांगल्याचे आगर ।
परमाब्धि आहे भवसागर तारणारी होडी ॥१॥
धन दौलत वेडया खेळ मनाचा ।
नश्वर हे जीवन, खेळ अर्धघडीचा ।
अंतकाळी कुणी न येती, ओढण्या जीवनगाडी ॥२॥
करावा स्वीकार परमाब्धिचा
अर्थ जाणूनि घ्यावा धर्माचा ।
एकच जन्म तुझा मानवा, नको होऊस गोचडी ॥३॥

सौ. सुरेखा आण्णासो वाडकर
षट्‌कोण चौक, इचलकरंजी.

माझे आडी गाव म्हणजे सुवर्णनगरी ।
आणि म्हणूनच येथील डोंगराला म्हणतात संजीवनगिरी ॥ध्रु॥
परमात्मराज महाराज अवतरले दत्त मंदीरी ।
हा दत्तावतार पाहूनी नजर जाई शिखरावरी ॥१॥
माझं गाव म्हणजे बाग फुललेलं नंदनवन ।
आणि तेथेच वसले आहे सर्वेज्य सांस्कृतिक भवन ॥२॥
जय परेश सर्वायण मंत्र म्हणूनी । जल भरूनि
आले नयनी । परमाब्धि ग्रंथामधुनी सर्व धर्म
एक आले हे कळूनी ॥३॥
माझं गाव म्हणजे जणु वनराई ।
दत्त जयंती सोहळा पावन होई ।
तेजस्वी मूर्तीचे दर्शन घेता सर्व संकटे दूर जाई ॥४॥

>कु. उज्वला लोखण्डे (डी. एड्‌.)
आडी.